इनव्हॅल्यू इन्फो सोल्युशनचा आयपीओ १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान
मुंबई, ता. १५ : विविध प्रकारची आयटी सेवा पुरवणारी कंपनी आयव्हॅल्यू इन्फो सोल्युशनचा आयपीओ १८ ते २२ सप्टेंबरदरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होत आहे. सुमारे ५६० कोटी रुपयांच्या या आयपीओसाठी २८४ ते २९९ रुपये किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. ही कंपनी मुख्यतः सायबर सिक्युरिटीविषयक सेवा देते तसेच डेटा सेंटरच्या उभारणीची कामे करते. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांचा महसूल २,४३९ कोटी रुपये झाला असून, हिताची, गुगल क्लाऊड यांच्यासह त्यांचे एकूण २,८७७ ग्राहक आहेत. परदेशातील सात ठिकाणी त्यांची कार्यालये आहेत. नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांचा करोत्तर नफा ८५.३० कोटी रुपये झाला असून, २०२३ मध्ये तो ५९ कोटी रुपये होता. त्यांच्या विक्रीतील वाढ दरवर्षी १७ टक्के चक्रवाढ दराने आहे. ‘सध्याचे हॅकिंग तसेच फसवणुकीचे वातावरण पाहता कंपन्यांनी रिॲक्टिव्ह होण्यापेक्षा प्रोऍक्टिव्ह होणे आवश्यक आहे. म्हणजेच सायबर हल्ला झाल्यानंतर सुरक्षा उपाययोजना करण्यापेक्षा आधीच सुरक्षेची उपायोजना करायला हवी’, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुमार पिल्ले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.