मुंबई

‘एल्फिन्स्टन’अभावी पर्यायी मार्गांवर कोंडी

CD

‘एल्फिन्स्टन’अभावी पर्यायी मार्गांवर कोंडी
एसटी भाड्यात २० रुपयांची वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी वाहतुकीस बंद करण्यात आल्यानंतर आज पहिलाच सोमवार असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. कामकाजाचा दिवस असल्याने दादर टीटीजवळील टिळक पूल आणि भारतमाता चौकाजवळील करी रोड पुलावर सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली.
वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्गांसाठी दिशादर्शक फलक लावले असले तरी वाहनचालकांना हे बदल अद्याप नीटसे कळले नसल्याने गोंधळ उडाला. त्यातच मुसळधार पावसामुळे काही भागांत पाणी साचले आणि कोंडी अधिकच वाढली. दादर टीटी परिसरात बेस्टची इलेक्ट्रिक बस बंद पडल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण झाला. बस बाजूला करण्यास दीड तास लागल्याने वाहनचालक व प्रवाशांचा त्रास वाढला. एल्फिन्स्टन पूल पाडकामामुळे शिवनेरी व शिवशाही बससाठी नवीन मार्ग ठरवण्यात आला आहे. दादर वाहतूक विभागाने एसटी प्रशासनाला दिलेल्या सूचनेनुसार, या बस आता परळ बस डेपो-वडाचा नाका-कमला मिल-दत्ताजी नलावडे फ्लायओव्हर-रखांगी जंक्शन-महालक्ष्मी स्थानक-सातरस्ता-आर्थर रोड नाका-चिंचपोकळी पूल या मार्गाने प्रवास करतील.
...
प्रवाशांना अतिरिक्त भुर्दंड
वळणदार मार्गामुळे एसटीला अधिकचा वेळ खर्ची पडणार असून, त्यामुळे त्यांच्या खर्चात वाढ झाली आहे. परिणामी एसटीने आपल्या किमान भाड्यात २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन भाडे मंगळवारपासून (ता. १६) लागू होणार आहे. प्रवाशांना हा अतिरिक्त भुर्दंड लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

India-Ukraine: भारताकडून येणाऱ्या डिझेलवर युक्रेन घालणार बंदी? रशियाच्या तेल खरेदीमुळे अनेक देशांनी केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT