मुंबई

‘रो-रो’ला आता दसऱ्याचा मुहूर्त!

CD

‘रो-रो’ला आता दसऱ्याचा मुहूर्त!
सागरी महामंडळाने कसली कंबर; मुंबई-कोकण प्रवास होणार सुखकर
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : कोकणवासीयांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. मुंबई ते कोकण यादरम्यान प्रवासी व वाहनांसाठीची रो-रो फेरीसेवा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू करण्याची तयारी सुरू असून, सागरी महामंडळाने त्यासाठी कंबर कसली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र व राज्यस्तरीय परवानग्या, हवामान अडथळे आणि तांत्रिक कारणांमुळे ही सेवा वारंवार पुढे ढकलली जात होती. गणेशोत्‍सवात ही सेवा सुरू होईल, अशाप्रकारे नियोजन सुरू होते, मात्र आता सर्व परवानग्या मिळाल्या असून, समुद्रस्थितीही अनुकूल होत आहे. त्यामुळे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरच या ऐतिहासिक सेवेचे उद्‌घाटन करण्याचा सरकारचा मानस आहे.

प्रवाशांना दिलासा
सणासुदीच्या काळात हजारो प्रवासी कोकणात आपल्‍या गावी जाण्यास निघतात. महामार्गावर तासन्‌तास होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, रेल्वेत तिकिटासाठीची धावपळ यामुळे प्रवास नेहमीच त्रासदायक ठरत होता. रो-रो सेवेच्या सुरुवातीमुळे प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे.

अशी सुरू आहे तयारी
सागरी महामंडळाने बोटीची सेवा सुरुवात करण्यासाठी तांत्रिक व प्रशासनिक तयारी पूर्ण केली आहे. जेट्टीवर प्रवाशांसाठी बैठकीची सोय, वाहनांसाठी स्वतंत्र लोडिंग-विचार केंद्र, तसेच सुरक्षित उतार व चढाव यासाठी योग्य उपाययोजना केली जात आहे. जयगड आणि विजयदुर्ग येथे जेट्टीवरून शहरात जाण्यासाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच हवामान अहवालावर नजर ठेवून समुद्रस्थिती अनुकूल असल्यास ताबडतोब सेवा सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

सेवा कशी असेल?
- भाऊचा धक्का (मुंबई) येथून जयगड आणि विजयदुर्गपर्यंत या बोटी धावणार आहेत.
- प्रवास वेळ : मुंबई - रत्नागिरी ३ ते ३.५ तास, मुंबई-सिंधुदुर्ग ५ तास
वेग : २५ नॉट्स दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट

आसन क्षमता
५५२ प्रवासी (इकोनॉमी )
४४ (प्रीमियम इकोनॉमी)
४८ (बिझनेस)
१२ (फर्स्ट क्लास)
वाहन क्षमता : ५० चारचाकी व ३० दुचाकी

तिकीटदर
इकोनॉमी : २,५०० रुपये
प्रीमियम इकोनॉमी : ४,००० रुपये
बिझनेस : ७,५०० रुपये
फर्स्ट क्लास : ९००० रुपये

वाहनांचे दर

चारचाकी : ६०००
दुचाकी : १००० रुपये
सायकल : ६०० रुपये
मिनी बस : १३,००० रुपये

रो-रो बोटीची यशस्वी चाचणी
मुंबई ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गावर रो-रो सेवेची प्रायोगिक चाचणी यशस्वीरीत्या पार पडली. तब्बल साडेतीन तासांचा हा प्रवास सुरळीत झाला. वेग, प्रवासी क्षमता व सुरक्षा तपासणी समाधानकारक ठरली असून, सागरी सुरक्षा यंत्रणांकडूनही हिरवा कंदील मिळाला आहे. प्रवाशांसह वाहन ने-आण करण्यात कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर ही सेवा सुरू करण्यास आता कोणताही अडथळा नाही.

कोकणवासीयांचा उत्साह
या सेवेची अनेक वर्षे वाट पाहिल्यानंतर आता ती वास्तवात येणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवात सेवा न मिळाल्याने नाराजी होती, पण नवरात्राेत्‍सवात ही सेवा सुरू होणार असल्याचे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आता मुंबई ते कोकण प्रवासाला नवा पर्याय मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी व सिंधुदुर्गातील प्रवाशांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

SCROLL FOR NEXT