डबेवाला बांधवांसाठी विशेष आरोग्यसेवा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर ‘सेवा पंधरवडा’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत मुंबई प्रदेशाध्यक्ष, आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्र, वांद्रे येथे सर्व डबेवाला कामगार बांधवांसाठी विशेष आरोग्यसेवा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरामध्ये मोफत नेत्रतपासणी, मोफत चष्मावाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांसारखे उपक्रम भरवले हाेते. तसेच सर्व डबेवाला कामगार बंधूंसाठी स्नेहभोजनाचे आयोजनदेखील करण्यात आले.
डबेवाला बांधवांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे, असे मत मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी व्यक्त केले.