यंदा एमबीए, एमएमएसचे प्रवेश घटले
राज्यात १० हजारांहून अधिक जागा रिकाम्या
मुंबई, ता. १८ : व्यवस्थापनशास्त्र अर्थात एमबीए-एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मोठी घट झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल चार टक्क्यांनी प्रवेश कमी झाले आहेत. मागील वर्षी ८३.५२ टक्के प्रवेश झाले होते. यंदा केवळ प्रमाण घटून ७९.६९ टक्के इतके प्रवेश झाले आहेत.
राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये एमबीएसाठी यंदा ४२ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र १० हजार ८६७ जागा रिकाम्या राहिल्या असून, यंदा जागा कमी असूनही रिक्त राहण्याचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक आहे. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या वर्षीपेक्षा ४६६ प्रवेश अधिक झाले असले तरी तीन हजार जागांची वाढ झाली होती. ५३ हजार ५०९ इतक्या जागांपैकी ४२ हजार ६४२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
सीईटी सेलच्या आकडेवारीनुसार २०२४-२५मध्ये एकूण ५० हजार ४९७ इतकी प्रवेश क्षमता होती. त्यापैकी ४२ हजार १७६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि आठ हजार ३२१ जागा रिकाम्या राहिल्या होत्या. प्रवेशाचे प्रमाण ८३.५२ टक्के इतके होते, तर २०२५-२६मध्ये प्रवेशातील व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या जागांत वाढ होऊन ५३ हजार ५०९ इतक्या जागा झाल्या होत्या. यापैकी ४२ हजार ६४२ जागांवर यंदा प्रवेश झाले आहेत. प्रवेशसंख्या थोडीशी वाढली असली तरी जागांच्या तुलनेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटून ७९.६९ टक्क्यांवर आले आहे. यामुळे यंदा तब्बल १० हजार ८६७ इतक्या जागा शिल्लक राहिल्या आहेत.
एमबीए/एमएमएस प्रवेशाची तुलना
तपशील......२०२४-२५..........२०२५-२६
नोंदणी........ ७१,९१५ ........७१,२४५
जागा......... ५०,४९७....... ५३,५०९
झालेले प्रवेश...... ४२,१७६...... ४२,६४२
शिल्लक जागा... 8,३२१.... (१६.४८ टक्के)...... १०,८६७ (२०.३१ टक्के)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.