मुंबई

सायबर गुलामीतून सुटलेल्यांकडूनच म्यानमार, कंबोडियात मजुरांची विक्री

CD

सायबर गुलामीतून सुटलेल्यांकडूनच म्यानमार, कंबोडियात मजुरांची विक्री
धोकादायक कल असल्याचे सायबर यंत्रणांचे निरीक्षण
जयेश शिरसाट
मुंबई, ता. १८ : कंबोडिया, लावोस, म्यानमार येथील सायबर गुन्ह्यांचे उगमस्थान असलेल्या अवैध कॉल सेंटरमध्ये गुलाम पुरवण्याच्या प्रक्रियेतील धक्कादायक कल सायबर यंत्रणांच्या समोर आला आहे. तेथील कैदेतून कशीबशी सुटका करून मायदेशी परतलेले तरुणच आता झटपट पैसे कमावण्याच्या हेतूने बेरोजगार तरुण शोधून, भरघोस पगाराचे प्रलोभन दाखवून त्यांना थायलंडमार्गे म्यानमार, कंबोडिया येथे विकत आहेत.

सायबर पोलिसांच्या दक्षिण विभागाने केलेल्या कारवाईतून हा कल अधोरेखित झाला आहे. पोलिस उपआयुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि पथकाने सलमान शेख या आरोपीस बेड्या ठोकल्या.
सलमान चार वर्षांपूर्वी अशाच प्रकारे सायबर गुलाम म्हणून म्यानमारच्या अवैध कॉल सेंटरमध्ये कैदेत अडकला होता. सुटकेसाठी कॉल सेंटर चालकांना खंडणी देऊन त्याने आपली सुटका करून घेतली. भारतात परतल्यावर अशा प्रकारे मानवी तस्करी किंवा मजूर पुरविल्यास बक्‍कळ पैसे मिळवता येतील, या विचाराने त्याने मुंबईतील पाच बेरोजगारांना थायलंड येथे नेत एका चिनी नागरिक महिलेस विकले.
सायबर यंत्रणांनी गेल्या काही महिन्यांमध्ये हा कल अनुभवला आहे. सलमानप्रमाणे या कैदखान्यात राहून आलेल्या अन्य व्यक्तींनी अवैध कॉल सेंटरना पैशांसाठी मानवी रसद पुरवल्यास सायबर भामट्यांचे फसवणुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांवर पडणारे जाळे अधिक विस्तृत होईल. परिणामी सायबर गुन्हे रोखणे कठीण होऊ शकेल. या देशांमधून नोकरीच्या संधींबाबत सामाजिक माध्यमांवरील जाहिरातींवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन सायबर विभागाने केले आहे.

एका व्यक्तीमागे एक लाख
परदेशातील या अवैध कॉल सेंटरसाठी गुलाम पुरवणाऱ्या व्यक्तींना एक ते दीड लाख रुपये मिळतात. सलमानच्या प्रकरणात नोकरीचे प्रलोभन दाखवून प्रत्येकी ३० हजार रुपये घेतले. पुढे थायलंडला सोडल्यावर त्याला येथील टोळीने प्रत्येक व्यक्तीमागे ठरलेली रक्कम अदा केली.

हाल आणि आर्थिक फसवणूक
कॉल सेंटरमध्ये येताच प्रथम एक वर्षाचा करार करून घेण्यात येतो. त्यात महिन्याला २५ हजार थाय बाथ इतका पगार नक्की होतो, जो ठरलेल्या रकमेपेक्षा कमी असतो. याच पैशातून जेवणावळ आणि अन्य खर्च कापून घेत उर्वरित रक्कम हाती ठेवली जाते. अनेकदा चूक, कसूर केल्याचा ठपका ठेवून दंड आकारला जातो. करारानुसार ठरलेल्या रकमेपेक्षा कमी पगार दिला जातो. या कॉल सेंटरच्या प्रवेशद्वारापासून सर्वत्र सशस्त्र पहारा असल्याने त्या धाकात कोणी आवाज उठविण्याची हिंमत करीत नाही. केलीच तरी त्याला अमानुष मारहाण केली जाते. दोनेक दिवस उपाशी ठेवले जाते.

याआधीची प्रकरणे
जेरी जेकबपासून सुरुवात
म्यानमार येथील अवैध कॉल सेंटरना चार वर्षांपासून सायबर गुलाम पुरविणाऱ्या जेरी जेकब या बोरिवलीत राहणाऱ्या तरुणास गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे आणि पथकाने गेल्यावर्षी मार्च महिन्यात विमानतळावर अटक केली. जेरी २०२१ पासून याच कॉल सेंटरमध्ये काम करीत होता. काळानुरूप त्याने तेथील परिस्थितीशी तडजोड केली आणि बढती मिळवत मानवी रसद पुरवू लागला. तो स्वतः, मुंबईतील साथीदारांकरवी बेरोजगार तरुण हेरून त्यांना म्यानमारमध्ये आणीत असे. अशा प्रकारे त्याने सुमारे ५० तरुणांना म्यानमारमध्ये आणले होते.

अभिनेता ते मानवी तस्कर
या वर्षी एप्रिल महिन्यात आरोपी मनीष ग्रे ऊर्फ मॅडी या तरुणास सायबर विभागाने अटक केली. मॅडी म्यानमार येथील सायबर टोळ्यांना गुलाम पुरवणारा भारतातला प्रमुख दलाल असल्याचे सांगण्यात आले. तो मूळचा तामिळनाडूचा रहिवासी असून, त्याने एका लोकप्रिय हिंदी मालिकेत भूमिका साकारली आहे. याशिवाय त्याने भारत, थायलंड येथे निर्मित वेब मालिका, चित्रपटांमध्येही अभिनय केल्याची माहिती पुढे आल्याचे सांगण्यात आले. या कारवाईत तब्बल ६० भारतीय तरुणांची म्यानमार येथून सुटका करण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

AFG vs SL Live : 6,6,6,NB,6,6,1w! ४० वर्षीय मोहम्मद नबीची वादळ खेळी; ६ चेंडूंत केलेल्या ५ धावा, नंतर १६ चेंडूंत ५५ धावांचा पाऊस Video

SCROLL FOR NEXT