देशात ४३ ते ५० लाख लोकांना विसरभोळेपणाचा आजार
आज जागतिक अल्झायमर्स दिन; राज्यात १६,६७० रुग्णांची तपासणी
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : देशात ४३ ते ५० लाख लोकांना विसरभोळेपणाचा आजार असून, रविवारी (ता. २१) साजरा होत असलेल्या जागतिक अल्झायमर्स दिनानिमित्त या आजाराबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा मेंदूशी संबंधित आजार आहे. साठ वर्षांपेक्षा मोठ्या व्यक्तींना अल्झायमर्स होतो. अल्झायमर्स हा स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) या आजाराचा एक प्रकार आहे. स्मृतिभ्रंशाचे वेगवेगळे प्रकार आहेत.
या आजारासाठी राज्यात सर्व जिल्हा रुग्णालयांत स्मृतिभ्रंश विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये मेमरी क्लिनिकअंतर्गत स्मृतिभ्रंशबाधित ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष बाह्यरुग्ण विभाग जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आले आहेत. स्मृतिभ्रंश रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. अल्झायमर्स हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण काही औषधे आणि उपचारांच्या माध्यमातून आजार स्थिर ठेवता येतो. सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाला योग्य उपचार मिळाल्यास १० ते १५ वर्षे किंवा त्याहूनही जास्त काळ सामान्य आयुष्य घालवता येते.
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम
जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत २०२४-२५मध्ये ५७,२२१ व २०२५-२६मध्ये (ऑगस्टपर्यंत) १६,६७० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ८० वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या ५० टक्के व्यक्तींना आजार होण्याची शक्यता असते. सध्या भारतात ४३-५० लाख अल्झायमर्सचे रुग्ण आहेत. सामाजिक, आर्थिक, धार्मिक सांस्कृतिक असे कुठलेही बंधन या आजाराला नाही. गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही.
राज्यातील चार वर्षांची आकडेवारी
वर्ष तपासणी
२०२२-२३ २७,३१५
२०२३-२४ ३३,५९७
२०२४-२५ ५७, २२१
२०२४-२५ १६,६७०
याची आवश्यकता...
२४ तास काळजी घेणारे केंद्रे, घरगुती काळजी सेवा, घरी रुग्ण तपासणीसाठी प्रशिक्षित आरोग्यसेवक, काळजी घेणाऱ्या व्यक्तीला प्रशिक्षित करण्याची गरज
लक्षणे ओळखा
बोलणे, ऐकणे, वास घेणे, हात हलवणे, चालणे, जेवण करणे, स्वच्छेतेच्या क्रिया हे सगळे मेंदूतल्या काही भागांतून नियंत्रित होत असत. अशा वेगवेगळ्या भागांना इजा झाल्यानंतर शरीरातल्या संबंधित अवयवापर्यंत सूचना पोहोचत नाही आणि ती क्रिया बंद पडते किंवा ती क्रिया आपण विसरतो. अल्झायमर्सचा रुग्ण ब्रश करणे, स्वच्छतेच्या क्रिया करणे हेसुद्धा विसरतो. तोंडात घास टाकल्यावर तो गिळायलाही विसरतो.
विनाकारण चिडचिड
- या रुग्णाची विनाकारण चिडचिड होते. गाढ आणि शांत झोप न लागणे.
- कुठल्याच गोष्टीत आनंद न वाटणे, नैराश्य येणे, अतिविचार करणे असा त्रास होतो.
आरोग्य तपासणी
वयाच्या पन्नाशीनंतर प्रत्येकाने दर सहा महिन्यांनी रक्त चाचण्या करायला हव्यात. नियमित तपासणी, यकृत कार्य चाचणी, किडनी कार्य चाचणी, व्हिटॅमिन बी-१२, व्हिटॅमिन डी चाचणी करणे गरजेचे आहे.
अशी घ्या काळजी
-हृदय निरोगी ठेवा, चांगली झोप
- जीवनशैली उत्तम ठेवा
- रोज किमान ३० मिनिटं कुठलाही व्यायाम करा
-दारू, सिगारेट, तंबाखूचे व्यसन टाळा
- साखर, मिठाचा आहारात समावेश कमी करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.