मुंबई

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे आज वितरण

CD

राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराचे आज वितरण

मुंबई, ता. २१ : शालेय शिक्षण विभागाकडून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील जाहीर करण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणवगौरव पुरस्काराचे वितरण सोमवारी, २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता टाटा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉइंट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदींच्या उपस्थितीत केले जाणार आहे. या वेळी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह अनेक मंत्री, शिक्षक आमदार आदी उपस्थित राहणार आहेत.

राज्यातील शाळांमध्ये उत्कृष्ट आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या १०९ शिक्षकांना २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षण गुणवगौरव पुरस्कार जाहीर झाला असून, यात पुरस्कार, प्राथमिक शाळेतील- ३८, माध्यमिक-३९, आदिवासी क्षेत्रातील प्राथमिक प्राथमिक शाळांतील-१९, थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका-आठ, तसेच विशेषमध्ये कला, क्रीडा-दोन, दिव्यांग शिक्षकांपैकी-एक आणि स्काऊट गाईडमधील दोन शिक्षकांचा समावेश आहे, तर यंदाच्या या पुरस्कारात मुंबईतील एकूण आठ शिक्षकांचा समावेश असून, यात प्राथमिकच्या तीन, माध्यमिकच्या चार आणि ‍आदर्श शिक्षिकांमध्ये एका शिक्षिकेने हा पुरस्कार पटकावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: अभिषेक शर्मा - शुभमन गिलच्या वादळाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; भारताचा सुपर फोरमध्ये पहिला विजय

IND vs PAK, Video: सुर्यकुमार यादवचा जुगाड! 'गार्डन'मध्ये फिरणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाला चतुराईने केले बाद

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

Pune: गोधड्या धुण्यासाठी गेले, पाण्यात अनेकजण अडकले, तरुणांनी धाडस दाखवलं अन्...; खडकवासलातील थरारक प्रसंग

IIM Centre: 'आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात';राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी; २०२६ पासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार

SCROLL FOR NEXT