मुंबई

देवीच्या सजावटीत फुलांची आरास

CD

देवीच्या सजावटीत फुलांची आरास
चाफा, शेवंती, झेंडू, मोगऱ्याच्या फुलांचा बाजारात बहर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ आणि घरोघरी साेमवारी (ता. २२) घटस्थापना करण्यात आली. देवीचे रूप आणखी सुंदर आणि विलक्षण दिसावे, यासाठी फुलांची आरास केली जाते, मात्र अचानक पडलेल्‍या पावसामुळे फुलांचे नुकसान झाले. सध्या फुले महाग झाली असली तरी देवीसाठी झेंडू, मोगरा, गुलाब, जुई, शेवंती, चाफा खरेदीसाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये भक्तांची गर्दी उसळली आहे.
मोगरा ८०० ते १२०० रुपये किलो, पिवळा व लाल झेंडू ३५० ते ४५० रुपये किलो, आंब्याच्या पानाची जुडी १० रुपये, १२० रुपयांत पाच गुलाबाची फुलं असे फुलांचे भाव दादरच्या फुल मार्केटमध्ये आहेत.
वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर सोमवारी घटस्थापना झाली. नवरात्रोत्सवात ठिकठिकाणच्या सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीत होते. लहानग्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची गरबा, दांडियाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे या उत्सवात देवीला अर्पण करण्यासाठी दादरच्या फुल मार्केटमध्ये विविध फुलांचा बहर आला आहे. या फुलांना केवळ सौंदर्याचेच नाही, तर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे.
देवीला अर्पण करण्यासाठी झेंडू, मोगरा, गुलाब, जुई, शेवंती, चाफा आणि सोनटक्का या फुलांचा सर्वाधिक वापर केला जातो. झेंडू हे पवित्रतेचे आणि मंगलकार्याचे प्रतीक मानले जाते. देवीच्या मंडपात झेंडूच्या माळांनी केलेली सजावट भक्तांना मंगलमय वातावरणाचा अनुभव देते. मोगऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र पाकळ्या शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक आहेत.
गुलाब प्रेम आणि आदर व्यक्त करणारे फूल मानले जाते, तर चाफा व जुई ही फुले सौंदर्य व भक्तिभाव दर्शवितात. शेवंती आणि सोनटक्का ही फुले दीर्घायुष्य, आरोग्य आणि शुभतेसाठी अर्पण केली जातात. नवरात्रोत्सवात प्रत्येक देवीच्या रूपानुसार विशिष्ट फुलांचे महत्त्व आहे. उदाहरणार्थ, महाकाळीला लाल फुले अर्पण करण्याची परंपरा आहे, तर महालक्ष्मीला पांढरी आणि पिवळी फुले अधिक प्रिय मानली जातात. नवरात्रोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि सौंदर्य यांचा मिलाप असून, फुलांमुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्येही सध्या फुलांची मागणी प्रचंड वाढली असून, विक्रेत्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे दादर येथील फुल मार्केटमधील फुलविक्रेते सांगतात.

फुलांचे भाव ( प्रतिकिलो )
पिवळा व लाल झेंडू – ५० ते ६० रुपये पाव किलो
लाल कलकत्ता झेंडू – ७० ते ८० रुपये
लाल झेंडू – ४० ते ५० रुपये
पांढरी शेवंती – २५० ते ३०० रुपये
गुलछडी – १०० रुपये
निशिगंधा – २०० रुपये
अष्टर – १५० रुपये
तुकडा गुलाब – १२० ते १५० रुपये
पाच, आंब्याच्या पानांची जुडी १० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhirendra Shastri : गरबा मंडपात येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडा, कारण...धीरेंद्र शास्त्रींच्या विधानाने खळबळ

मोठी बातमी! आता बॅंकेत त्याच दिवशी क्लिअर होणार धनादेश (चेक); ‘आरबीआय’चे सर्व बॅंकांना परिपत्रक; खात्यात पैसे ठेवूनच द्यावा लागणार त्या तारखेचा चेक

Gadchiroli News : १०६ शरणागत माओवाद्यांनी गिरवले शिक्षणाचे धडे

Ladki Bahin Yojana : सरकारच्या लाडकी बहिण योजनेत चार हजार ९०० कोटींचा भष्ट्राचार; खासदार सुप्रिया सुळेंचा घणाघाती आरोप

Pune Encroachment : आंदेकरच्या प्रभावक्षेत्रात अतिक्रमण कारवाई; माहिती देण्यास महापालिका अधिकाऱ्यांची टाळाटाळ

SCROLL FOR NEXT