मागण्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मान्य न झाल्यास आंदोलन
‘बेस्ट’ संघटनेचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः सर्व प्रलंबित मागण्या ३१ ऑक्टोबरपर्यंत मान्य कराव्यात; अन्यथा बेस्टमधील सर्व कर्मचारी तीव्र आंदोलन उभारतील, असा इशारा देत दि बीईएसटी वर्कर्स युनियनने महापालिका व बेस्ट प्रशासनाला दिला आहे.
युनियनने केलेल्या मागण्यांमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत ग्रॅच्युइटी व इतर देयके तातडीने देणे, २०१९च्या करारानुसार ३,३३७ बसगाड्यांचा ताफा कायम ठेवण्यासाठी महापालिकेकडून निधी मंजूर करणे, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे, खासगी कंत्राटदारामार्फत भाडेतत्त्वावर बस घेण्याची पद्धत बंद करणे आणि सातव्या वेतन आयोगानुसार वेतनकरार, पदोन्नती, रिक्त पदे, अंतिम देयके, कोविड भत्ता, अनुकंपा नोकऱ्या आदी प्रश्नांवर तातडीने निर्णय घेणे, या प्रमुख मागण्या आहेत. युनियनचे सरचिटणीस शशांक राव म्हणाले, प्रशासनाकडून मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. कामगारांच्या हक्काच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारू. ३१ ऑक्टोबर ही शेवटची मुदत आहे. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनावरच असेल. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या या इशाऱ्यामुळे बेस्ट प्रशासन आणि महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
...
बेस्ट प्रशासन आमच्या मागण्या सतत दडपून टाकत आहे. कामगारांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. आम्ही ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर आमचे सर्व कर्मचारी रस्त्यावर उतरतील, त्याची संपूर्ण जबाबदारी बेस्ट प्रशासन व महापालिकेवर असेल.
- शशांक राव, सरचिटणीस, दि बीईएसटी वर्कर्स युनियन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.