मुंबई

रस्‍त्‍यांच्या तक्रारी डॅशबोर्डवर करता याव्यात

CD

रस्‍त्‍यांच्या तक्रारी डॅशबोर्डवर करता याव्यात
ॲड. आशीष शेलार यांचे महापालिकेला निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : रस्‍त्‍यांच्या काँक्रीटीकरणांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी पालिकेने रस्‍ते डॅशबोर्ड उपलब्‍ध करून दिला आहे. काँक्रीटीकरणात तेथील उपयोगिता वाहिन्यांचे नुकसान झाल्‍यास त्‍याबाबतच्या तक्रारीसुद्धा नागरिकांना करता याव्यात, याची सुविधा डॅशबोर्डवर उपलब्‍ध करून द्या, असे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी बुधवारी (ता. २४) महापालिका अधिकाऱ्यांना दिले.
खड्डे, अपुरे नियोजन आणि त्यातून निर्माण होणारी वाहतूक कोंडी या मुंबईतील रस्‍त्‍यांबाबत नागरिकांच्या मुख्य तक्रारी असतात. यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पालिकेच्या रस्ते व पूल विभागाच्या कामांची संयुक्त आढावा बैठक पालकमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी घेतली.
वांद्रे पश्चिम, खार पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम भागातील नागरिकांना रस्त्यांची आवश्यकता आहे. त्याचवेळी कामावेळी होणाऱ्या कोंडीच्या अडचणींवर तोडगा निघणे गरजेचे आहे. यासाठी महापालिकेने एक पारदर्शक डॅशबोर्ड विकसित केला आहे. ४ सप्टेंबरपासून हा डॅशबोर्ड जनतेसाठी खुला असून, त्यात रस्त्यांची यादी, नकाशे, पूर्ण झालेल्या कामांचे छायाचित्र, कंत्राटदार व अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, पुढील कामांचे नियोजन उपलब्ध आहे.
नागरिकांना त्यांच्या विभागातील रस्त्यांबाबतच्या तक्रारी थेट डॅशबोर्डवर टाकता याव्यात, तोडलेल्या पाण्याच्या लाइन, वीजजोडणींचे विश्लेषण डॅशबोर्डवर द्यावे, त्या नुकसानीस जबाबदार कंत्राटदारांना दंड करावा, तक्रारींचे निवारण व त्याचा अहवाल नागरिकांना मिळावा, अशा अनेक सूचना पालकमंत्र्यांनी केल्‍या आहेत.

...तर दंडात्‍मक कारवाई करा!
वेळेत आणि दर्जेदार काम करणाऱ्या कंत्राटदाराला प्राधान्य द्यावे. तसेच अपूर्ण राहिलेले रस्ते तातडीने पूर्ण करावेत. कंत्राटदार दिरंगाई करीत असल्‍यास दंडात्‍मक कारवाई करावी, अशा सूचना आशीष शेलार यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandharpur Politics : 'पाटलांच्या पराभवासाठीच शिंदेंचा भाजप प्रवेश'; मंत्री जयकुमार गोरेंचा आमदार पाटलांना सूचक इशारा

Nashik Kumbh Mela : ऐतिहासिक निर्णय! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या 66 किमी परिक्रमा मार्गाला 7,922 कोटींचा 'हिरवा कंदील'

Black Friday Sale : फक्त 1 रुपया देऊन घरी न्या AC, TV अन् फ्रिज! दिवाळीला सुद्धा विकलं गेलं नाही इतक स्वस्त सामान, ऑफर पाहा एका क्लिकवर

Arnav Khaire Death: भाषेचं विषारी राजकारण, तुमच्या मुलांसाठी मराठी मुलाचा जीव घेणार का? चित्रा वाघ यांचा सवाल

Kolhapur News: अल्पवयीन चालकांना पोलिसांचा दणका; दोघांना दंड, शाळा, महाविद्यालय परिसरात हुल्लडबाजांवर कारवाईः अल्पवयीन मुलांच्या पालकांवरही बडगा

SCROLL FOR NEXT