मुंबई

मुंबई विमानतळावर प्रवाशांची ‘सेल्फ सर्व्हिस’ला पसंती

CD

मुंबई विमानतळावर प्रवाशांची ‘सेल्फ सर्व्हिस’ला पसंती
विमान प्रवास अधिक जलद

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांकडून तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सेल्फ चेक-इन, बॅगेज ड्रॉप आणि बायोमेट्रिक बोर्डिंगमुळे विमान प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर झाला आहे. गेल्या १६ महिन्यांत (एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५) मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी विमानतळावरील डिजिटल सेवेचा वापर केला आहे.
सेल्फ-चेक-इन किऑस्क प्रवाशांना काउंटरवर वाट न पाहता चेक इन करणे, बोर्डिंग पास प्रिंट करणे, बॅगेज टॅग तयार करणे आणि सीट प्राधान्य बदलणे सोपे झाले आहे. उपरोक्त काळात ३.८६ दशलक्षांहून अधिक प्रवाशांनी सेल्फ-चेक-इन किऑस्क वापरून त्यांचे बोर्डिंग पास प्रिंट केले. सेल्फ-चेक-इन किओस्कवर २६४,४१४ बोर्डिंग पास प्रिंट केले. त्यात एप्रिल २०२४ च्या (१,८६,४१९ बोर्डिंग पास) तुलनेत जवळपास ४१.८४ टक्के वाढ झाली आहे.
...
सेल्फ-चेक-इन किऑस्कच वापर
इंडिगो - २.५८ दशलक्ष बोर्डिंग पास
एअर इंडिया - १.०९ दशलक्ष बोर्डिंग पास
एअर इंडिया एक्स्प्रेस - ५३,३०१ बोर्डिंग पास
एअर फ्रान्स - ९०,९०२ बोर्डिंग पास
एमिरेट्स - १८,३५६ बोर्डिंग पास
लुफ्थान्सा- १८,०१७ बोर्डिंग पास
...
सेल्फ-बॅगेज ड्रॉप चेक-इन
सीएसएमआयएमधील ३२ सेल्फ-बॅगेज ड्रॉप युनिट्समध्ये प्रवाशांकडून वापरात वाढ झाली आहे. एप्रिल २०२४ ते ऑगस्ट २०२५ दरम्यान एसबीडी मशीनकडून सुमारे ७.१५ लाख बॅग प्रोसेस करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT