मुंबई

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन

CD

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन
मुंबई, ता. २६ ः मराठवाडा, सोलापूर, धाराशिवसह विविध भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. या संकटाच्या काळात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. शासन मदत करत असले तरी समाजाने यात सक्रिय सहभाग नोंदवणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे दहिबावकर यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी थेट वस्तू स्वरूपात शेतकरीबांधवांना मदत करावी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत यथाशक्ती योगदान द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त भागांमध्ये सध्या अन्नधान्य, कपडे, औषधे व आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात गरज असून, गणेश मंडळांनी सढळ हस्ते मदत करावी, असे समन्वय समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard: ''बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा, अन्यथा कुत्र्यांप्रमाणे बिबटे भटकतील'', वनमंत्र्यांनी दिले आदेश

Sharad Pawar Ajit Pawar : कोल्हापूरनंतर आता 'या' जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी लढणार एकत्र, भाजपचा करेक्ट कार्यक्रम होणार?

Children’s Day 2025: बालदिनानिमित्त सरप्राईज द्यायचंय? घरच्या घरी बच्चे कंपनीसाठी करता येतील 'या' हटके गोष्टी

Powai Accident: पवईत भीषण अपघात! सांडपाण्याच्या टाकीत २ मजुरांचा श्वास गुदमरला; एकाचा मृत्यू, एक गंभीर

Latest Marathi Breaking News : दिल्ली स्फोटातील जखमींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली

SCROLL FOR NEXT