मुंबई

आग विझली, प्रश्नांचा धूर कायम!

CD

आग विझली, प्रश्नांचा धूर कायम!
कोस्टल रोडवरील अग्‍निरोधक यंत्रणांची परीक्षा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः कोस्टल रोडवरील दक्षिणेकडील बोगद्यात नुकतीच एका कॅबला आग लागली होती. गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने दाट धुराचे लोट पसरले आणि वाहतुकीत मोठा गोंधळ झाला; मात्र बोगद्यातील आधुनिक अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना वेळेवर सक्रिय झाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. आग विझली तरी असंख्य प्रश्नांचा धूर मात्र कायम असल्याचे अग्निशमनतज्ज्ञांनी सांगितले आहे.

कंट्रोल रूम सज्ज
एका कॅबला आग लागल्यावर बोगद्यातील अग्निशमन प्रणाली कार्यरत झाली आणि काही सेकंदातच कंट्रोल रूमला धोक्‍याचा इशारा गेला. त्यामुळे बचाव पथके तत्काळ सतर्क होऊन सज्ज झाली आणि कार्य सुरू केले. त्‍यामुळे कारवाईस विलंब झाला नाही. मदतीसाठी वाहने लगेच बोगद्यात दाखल झाली. अग्निशमन दल घटनास्थळी धावून आले आणि काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले. प्रवाशांना वेळेवर बाहेर काढल्याने जीवितहानी टळली. बोगद्यातील पंखे तातडीने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्‍याने काही मिनिटांत धूर बाहेर फेकण्यात यश आल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

आपत्कालीन यंत्रणेचा फायदा
बोगद्यातील आपत्कालीन दरवाजे व जिने तयार आहेत. तेथील कर्मचाऱ्यांनादेखील धोक्‍याचा इशारा देण्यात आला होता. त्‍यामुळे मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असती तरी प्रवाशांना बाहेर पडणे शक्य झाले असते. संपूर्ण बोगदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. आपत्कालीन सूचना देणाऱ्या यंत्रणेमुळे वाहनचालकांना तत्काळ घोषणा करून मार्गदर्शन करता येते. या यंत्रणेचा वापर करत वाहतूक पोलिसांनी बोगद्यातील वाहने पर्यायी मार्गावर वळवून हाजी अली व ब्रीच कँडी येथील बाहेर जाण्याचे मार्ग सज्ज केले. वाहतूक पोलिसांनी तातडीने गाड्यांना हाजी अली व ब्रीच कँडीकडे वळवली. त्यामुळे मोठा अडथळा न येता वाहनचालकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला.

संभाव्य दुर्घटना टळली
गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने बोगद्यात शेकडो वाहने अडकण्याची शक्यता होती; मात्र सुरक्षा उपाययोजनांची तत्परता आणि अग्निशमन दलाचा वेळेत हस्तक्षेप यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली राहिली. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की कोस्टल रोड हा मुंबईतील महत्त्वाचा रस्ता आहे. तो बऱ्याच ठिकाणी भूमिगत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर अधिक भर देण्यात आला आहे. यासाठी जगभरातील यंत्रणांचा अभ्यास करून शक्य तितक्या उपाययोजना करण्यात आल्या.

प्रश्न कायम?
भुयारी मार्गातील मध्यवर्ती ठिकाणी ही आग लागली असती तर धूर बाहेर कसा काढला असता, हा प्रश्न कायम आहे. भुयारी मार्गाच्या मध्यभागी भविष्यात एखाद्या ईव्ही बसने पेट घेतल्‍यास त्यातून निर्माण होणारी उष्णता व धूर तुम्ही कमी कसा करणार आहात? कोस्टल रोडवर वाहतूक कोंडी वाढली आहे. या परिस्थितीत अग्निशमन बंब तिकडे कसे पोहोचणार, असा सवाल एका अग्निशमनतज्‍ज्ञाने उपस्थित केला आहे. त्यामुळे अग्निशमन स्थानकाची उपयोगिता काय असणार आहे, यावर विचार करणे गरजेचे असल्याचे या तज्ज्ञाने सांगितले.

फायर स्टेशन उभारणार
कोस्टल रोड मार्गालगत दोन अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी अग्निशमन दलाने केली होती; मात्र यापैकी एका स्थानकाची मंजुरी मिळाली आहे. वर्षभराच्या आत याचे बांधकाम पूर्ण होईल, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT