मुंबई

मुंबई विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राची स्थापना

CD

मुंबई विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राची स्थापना
केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून मंजुरी

मुंबई, ता. २७ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार, न्याय, समानता आणि मानवी हक्कांचे पुरस्कर्ते म्हणून ओळखले जातात. वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या वैचारिक वारशाचा गौरव करण्यासाठी मुंबई विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रात ‘डॉ. आंबेडकर चेअर’ (डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्र) स्थापन केले जाणार आहे. यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने मंजुरी दिली असून लवकरच अध्यासन कार्यान्वित होणार आहे.

डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्रातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक न्याय, समता, मानवी हक्क आणि आर्थिक सक्षमीकरणाशी निगडित विचार शैक्षणिक व धोरणात्मक पातळीवर प्रसारित केले जातील. शिक्षण व रोजगार क्षेत्रातील धोरणांचा वंचित घटकांवर होणारा परिणाम अभ्यासणे, कौशल्य विकासासंबंधी उपयुक्त योजना सूचवणे, विविध परिसंवाद, व्याख्याने, परिषदा आयोजित करणे, ही या केंद्रांची मुख्य उद्दिष्टे असतील. तसेच शिक्षणातील प्रवेश, गुणवत्ता व समावेशकता यावरही विशेष भर दिला जाणार आहे. मुंबई विद्यापीठात आजमितीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कार्यान्वित असून या केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या नव्या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राच्या स्थापनेमुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक देवाणघेवाणीला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, तसेच बहुविद्याशाखीय अभ्यास व संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. या केंद्राअंतर्गत शिक्षण क्षेत्रातील संविधानिक विविध तरतुदींचा प्रभाव, वंचित घटकांचे शैक्षणिक प्रगतीचे प्रवाह, तसेच शैक्षणिक व रोजगारातील दरी कमी करण्यासाठी राबविलेल्या योजना यांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. त्याचबरोबर एम. ए. सोशल पॉलिसी, एम. ए. बुद्धिस्ट स्टडीज् यांसारखे विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह संशोधन प्रकल्प, डॉक्टरेट व पोस्ट डॉक्टरेट अभ्यासक्रम राबविले जाणार आहेत. लवकरच डॉ. आंबेडकर फाउंडेशन आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात या डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राच्या स्थापनेसाठी करार केला जाणार आहे. यासाठी वार्षिक ७५ लाखांचे अनुदानही मंजूर करण्यात आले आहे.


सर्वसमावेशक समाज घडविण्याचा प्रयत्न
‘मुंबई विद्यापीठात स्थापन होत असलेले डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्र हा केवळ एक शैक्षणिक उपक्रम नसून संशोधन आणि सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने मुंबई विद्यापीठाने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. सामाजिक न्याय व समतेच्या तत्त्वांवर आधारित धोरणांची निर्मिती हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असून याद्वारे शिक्षण, रोजगार व समतेसंबंधी धोरणांचा अभ्यास करून न्याय व सर्वसमावेशक समाज घडविण्याचा प्रयत्न होईल,’ असा आशावाद मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Eknath Shinde : अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Parli Vaijnath News : तालुक्यात आभाळ फाटले, तीन मंडळात अतिवृष्टी; गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले, शेतातील पिकांत पाणीच पाणी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

SCROLL FOR NEXT