मुंबई

विमानतळावर २२ कोटींचा मुद्देमाल जप्त

CD

विमानतळावर २२ कोटींचा मुद्देमाल जप्त

परदेशी गांजा, परकीय चलन आणि सोन्याच्या भुकटीचा समावेश; पाच प्रवाशांना अटक

मुंबई, ता. २७ ः सीमा शुल्क विभागाने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ परकीय चलन आणि सोन्याची तस्करी रोखत २२ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सीमा शुल्क विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान गोपनीय माहिती आणि प्रवाशांची प्रवासाची एकंदरीत लय, तऱ्हा लक्षात घेत (प्रोफायलिंग) करण्यात आली. या कारवाईत श्रीलंकेच्या कोलंबो आणि थायलंडच्या बँकॉक शहरातून मुंबईत आलेल्या दोन प्रवाशांकडून अनुक्रमे २.६, १८.४ किलो परदेशी गांजा (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आला. या साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एकूण २१ कोटी इतकी किंमत असल्याचे सांगण्यात आले. अन्य तीन कारवायांमध्ये अरब अमिराती (दुबई) आणि इंडोनेशिया (जकार्ता) येथे जाण्यासाठी विमानतळावर आलेल्या तीन प्रवाशांकडून सुमारे ७६.६६ लाख भारतीय मूल्य असलेले परकीय चलन जप्त करण्यात आले. त्यात अमेरिकन डॉलर आणि दिऱ्हामचा समावेश आहे. तर विमानतळाच्या आगमन कक्षातील शौचालयात ३६५ ग्रॅम वजनाची सोन्याची भुकटी बेवारस अवस्थेत आढळली. या भुकटीची किंमत ३८.१० लाख इतकी असावी, असे सांगण्यात आले. या कारवायांमध्ये पाच प्रवाशांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; पोलिस येणार अडचणीत

Madha News : अडाणी बापलेकांनी स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय पावसात थांबून सुमारे २०० जनावरांचे वाचवले जीव

PMRDA DP Issue : पीएमआरडीएचा डीपी रद्द; राज्य शासनाने काढली अधिसूचना

SCROLL FOR NEXT