मुंबई

तासाला दोघांना मेंदूचा झटका

CD

तासाला दोघांना मेंदूचा झटका
९० टक्‍के रुग्णांना मिळतात उशिरा उपचार, जागरुकतेची गरज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः मुंबईमध्ये दर तासाला मेंदूच्या झटक्‍याचे (ब्रेन स्‍ट्रोक) सरासरी दोन रुग्ण आढळत असल्‍याचे समोर आले आहे. लोकांमध्ये अजूनही लक्षणांबद्दल जागरूकता नाही, ही चिंतेची बाब आहे. सुवर्णकाळ संपल्यानंतर ९० टक्‍के लोक रुग्णालयात पोहोचतात. त्‍यामुळे हा आजार आता जिवघेणा ठरत असल्‍याची बाब मुंबईत नुकत्‍याच झालेल्‍या एका परिषेतून समोर आली आहे.
उपचाराला विलंब होत असल्‍याने मज्जासंस्थेशी संबंधित नुकसान होते. अनेकांना तात्पुरते, कायमचे अपंगत्व येते. लक्षणे ओळखून वेळेवर उपचार घेण्याचे आवाहन डॉक्‍टरांनी केले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले, की वेळेवर उपचार केल्यास जीव वाचू शकताे. सेरेब्रोव्हस्कुलर सोसायटी ऑफ इंडियाने शुक्रवारी (ता. २६) न्यूरोव्हॅस्कॉन २०२५चे आयोजन केले होते. मुंबईतील प्रसिद्ध मज्जासंस्था विकारांचे तज्ञ डॉक्टर, न्यूरोसर्जन या परिषदेत उपस्थित होते. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता आणि वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. संगीता रावत यांनी स्पष्ट केले, की भारतात दररोज सुमारे तीन हजार मेंदूच्या झटक्‍याचे रुग्ण नोंदवले जातात आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येही ही संख्या चिंताजनक आहे. आमच्या अनुभवात, एकट्या परळ परिसरात दररोज आठ-दहाचे रुग्ण आढळतात. उपचार जितक्या लवकर सुरू होतील, तितके चांगले परिणाम मिळतात. स्ट्रोकची लक्षणे दिसल्यानंतर पहिले साडेतीन ते चार तास महत्त्वाचे असतात, याला ‘सुवर्णकाळ’ म्हणून ओळखले जाते. रुग्ण जितका अधिक वेळ घेतो तेवढ्या अधिक मेंदूच्या पेशी मरतात. दर मिनिटाला लाखो मज्जातंतू पेशी नष्ट होतात, त्‍यामुळे बरे होण्याची शक्यता कमी होते.
डॉ. बटुक डायोरा यांनी स्पष्ट केले, की मेंदूला रक्तपुरवठा करणारी धमनी रक्ताच्या गुठळ्यामुळे बंद होते, ज्यामुळे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि मेंदूच्या पेशी मरतात. रक्तस्राव स्ट्रोक हा मेंदूतील धमनी फुटल्यामुळे होतो. बहुतेकदा उच्च रक्तदाबामुळे जागरूकतेचा अभाव हे उपचारांना उशीर होण्याचे एक प्रमुख कारण आहे. लवकर निदान आणि प्रतिबंध जीव वाचवू शकतो आणि बरे होण्याचे प्रमाण वाढवू शकतो, असे त्‍यांनी सांगितले.

ही आहेत कारणे
उच्च रक्तदाब, मधुमेह, तंबाखूचा वापर, लिपिड असंतुलन, जीवनशैलीतील बदल ही प्रमुख कारणे आहेत.
अशी आहेत लक्षणे
चेहरा वाकडा होणे, हात आणि पाय अचानक कमकुवत होणे, अस्पष्ट बोलणे, संतुलन बिघडणे, अस्पष्ट दृष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final : भारताने पाकड्यांना ठेचले! २१ दिवसांत तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून जिंकला आशिया चषक; शेजारी तोंड लपवताना दिसले

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT