मुंबई

दिवार, हेराफेरीच्या आठवणी पुसणार

CD

दिवार, हेराफेरीच्या आठवणी पुसणार
एल्फिन्स्टन पूल पाडकाम; परेश रावल यांनी जागवल्या आठवणी
नितीन जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : पालिकेने एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरू केले आहे. ११२ वर्षांचा हा पूल येत्या काही दिवसांत जमीनदोस्त केला जाणार आहे. या पुलाशी अनेक चित्रपट निर्मितीच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. ‘दीवार’ चित्रपटातील सर्वाधिक गाजलेल्या एका सीनचे येथे चित्रीकरण झाले होते. या पुलालगतच्या सूरज या इमारतीत ‘हेराफेरी’ सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. अभिनेते परेश रावल यांनी तर चित्रीकरणादरम्यान मित्राच्या घरी आल्यासारखे वाटायचे, असे सांगत आठवणी काढल्या. आता या पुलाच्या पाडकामासोबत या आठवणीदेखील पुसल्या जाणार आहेत.

सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या कारकीर्दीत ‘दीवार’ हा चित्रपट मैलाचा दगड ठरला. याच चित्रपटातील एक दृश्‍य आहे, जिथे सुमित्रा देवी (निरुपा रॉय) म्हणजे तिच्या मुलांसह (अमिताभ, शशी कपूर) रस्त्याकडेला राहत असते. काही भावनिक दृश्याचे चित्रीकरण पुलाच्या अगदी समोर झाले. ‘दीवार’मधील तो पूल म्हणजे एल्फिन्स्टन पूल आहे. १९७५ साली आलेला हा चित्रपट बिग बीच्या करिअरला कलाटणी देणारा ठरला. या चित्रपटातील काही दृश्‍ये ही प्रभादेवी स्थानकाजवळील पुलाखाली चित्रित करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी एकदा ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये याच्या आठवणींना उजाळा दिला होता.


‘फिर हेराफेरी’ या २००६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे. जॉनी लिव्हर, सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमात होती. १९४४ मध्ये बांधलेल्या सूरज या इमारतीत या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले होते. आता एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामत बाबू भाईंचे घर असणारी ही ऐतिहासिक इमारत जमीनदोस्त होणार आहे. या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या आठवणी स्थानिक रहिवाशांच्याही डोळ्यांसमोर आजही तरळतात. चित्रीकरणादरम्यान एवढी गर्दी होत होती, की रहिवाशांना त्यांच्याच घरात जाणे कठीण होत होते. त्यानंतर येथील रहिवाशांनी चित्रकीरणासाठी चाळ देणे बंद केले. त्यातच या इमारतीवर हातोडा पडल्याने आता केवळ आठवणी शिल्लक राहणार आहेत.

===
सूरज या इमारतीतील रहिवासी अतिशय मनमिळाऊ आणि मदत करणारे होते. तिथले वातावरण एवढे मैत्रीपूर्ण होते की आम्ही चित्रीकरण करतो असे वाटले नाही. आरामात बसून आम्ही रहिवाशांसोबत गप्पा मारत होतो. ते आम्हाला चहा आणून द्यायचे. आम्हाला चित्रीकरणासाठी नव्हे तर मित्राच्या  घरी आल्यासारखे वाटायचे.
- परेश रावल, अभिनेता

हेराफेरीच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने चित्रपट कसा बनतो ते जवळून अनुभवता आले. चाळीतील नळावरची भांडणे असो, कलाकारांचे अजरामर डायलॉग अजूनही आठवणीत आहेत.
- तुषार गांगनाईक, स्थानिक रहिवासी


हेराफेरीचे चित्रीकरण आठ दिवस चालले. सर्व कलाकार पहिल्या मजल्यावर थांबत होते. ते रोज सकाळी यायचे व रात्री शूटिंग संपल्यावर परत जायचे. शूटिंगसाठी झालेल्या गर्दीचा आम्हाला खूप त्रास झाला. मात्र त्याच्या आठवणी आजही आहेत.
- अशोक रांका, अध्यक्ष, सूरज इमारत, सोसायटी
=
‘दीवार’ चित्रपटात एल्फिन्स्टन पुलाखाली जो बोगदा आहे त्या ठिकाणी निरूपा रॉय आपल्या दोन मुलांना घेऊन राहते, असे एक दृश्‍य दाखवले आहे. याच पुलाजवळ अमिताभ व शशी कपूर या भावांची भेट होते, असेही एका दुश्‍याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. दिग्दर्शकाने अर्धे चित्रीकरण एल्फिन्स्टनला केले आणि यासारखा सेट राजकमल स्टुडिओमध्ये उभारला होता. ‘दीवार’ पाहताना एल्फिन्स्टन पूल डोळ्यांसमोर उभा राहतो.
- दिलीप ठाकूर, चित्रपट अभ्यासक

पुलाच्या नावात घोळ
एल्फिन्स्टन पुलाचे नाव कसे पडले ते अजूनही स्पष्ट नसल्याचे मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक भरत गोठोसकर सांगतात. मध्य रेल्वेचे इंग्रज अभियंते ई. बी. कॅरल यांनी रेल्वेच्या डब्यांच्या रोषणाईचे नियोजन केले होते. त्यांच्या स्मरणार्थ या पुलाचे नाव कॅरल (Carroll) ब्रिज असे ठेवण्यात आले पण स्थानिक लोक त्याचा उच्चार ‘करोल ब्रिज’ असा करायचे. पुलावरच्या शिलालेखावर ‘परेल ब्रिज’ असे कोरले आहे. तर महापालिकेच्या नकाशावर ‘एल्फिंस्टन ब्रिज’ असे नाव दिसते.

..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Final: 33 runs 9 wickets ! पाकिस्तानी गडगडले; हवेत उडत होते, भारतीय स्पिनर्सने जमिनीवर आपटले

IND vs PAK Final Live: हायव्होल्टेज ड्रामा! सूर्यकुमार यादव पाकिस्तानी कर्णधार सलमान आगावर संतापला; अम्पायरसोबत वाद, वाचा नेमका काय राडा झाला

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

SCROLL FOR NEXT