मुंबई

हृदय रुग्णांसाठी ‘स्टेमी’ वरदान!

CD

हृदय रुग्णांसाठी ‘स्टेमी’ वरदान!
केईएममध्ये आतापर्यंत २६० रुग्णांवर उपचार; तरुणांचे प्रमाण सर्वाधिक
मुंबई, ता. २८ : शहरातील हृदयविकार रुग्णांसाठी केईएम रुग्णालयात स्टेमी प्रोजेक्टअंतर्गत उपचार केले जात असले तरीही अनेक रुग्ण वेळेवर पोहोचत नसल्याने अडचणी वाढत आहेत. स्टेमी म्हणजे हृदयाचा मोठा झटका येणे. या वेळी त्वरित उपचार न मिळाल्यास प्राणहानी होण्याची शक्यता असते.
केईएम रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञ डॉ. चरण लांजेवार यांनी सांगितले, की शहरातील रुग्णांमध्ये जास्तीत जास्त तीन ते पाच किलोमीटर अंतरावर राहणारे सर्वाधिक रुग्ण येतात. सर्वसामान्य लोक आणि गरीब रुग्ण सर्वाधिक येतात. आपत्कालीन परिस्थितीत आलेल्या रुग्णांसाठी स्टेमी वरदान ठरत आहे.
केईएममध्ये स्टेमी प्रकल्पांतर्गत २६० रुग्ण उपचारासाठी आले आहेत. यापैकी सुमारे ६७ टक्के पुरुष आणि ३३ टक्के महिला रुग्ण आहेत. डॉ. चरण लांजेवार यांनी स्पष्ट केले, की महिलांमध्ये छातीतील वेदना सहसा दुर्लक्ष केल्या जातात. त्यामुळे त्यांच्या उपचारात विलंब होतो. स्टेमीमध्ये ‘गोल्डन अवर’ म्हणजेच छाती दुखण्यापासून उपचारासाठी पोहोचण्याचा वेळ दोन तासांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे. शहरातील रुग्ण सरासरी १२ ते १४ तासांत रुग्णालयात पोहोचतात. प्राथमिक उपचार आणि स्टेमी प्रोजेक्टमुळे रुग्णांचे जीव वाचविण्यास मदत होत आहे. मात्र शहरात आणखी कॅथ लॅब्स आणि संसाधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे डॉ. लांजेवार यांनी सांगितले.

तरुणांचे प्रमाण सर्वाधिक
३० वर्षांखालील ४० टक्के रुग्ण येतात. हे रुग्ण कमी उत्पन्न दर्जाचे असून, त्यांचे मासिक उत्पन्न १५ ते २० हजार रुपयांच्या दरम्यान असते. रुग्णांची सामाजिक-आर्थिक स्थिती आणि शहरातील अडचणी लक्षात घेऊन आरोग्य सुविधा अधिक प्रभावी बनवणे आवश्यक असल्‍याचे डॉ. लांजेवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final : भारताने पाकड्यांना ठेचले! २१ दिवसांत तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून जिंकला आशिया चषक; शेजारी तोंड लपवताना दिसले

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT