मराठवाड्यातील पावसामुळे एसटीच्या उत्पन्नात घट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अनपेक्षित आणि मोठ्या पावसाचा एसटी बससेवेला फटका बसला असून, प्रवासीसंख्येत व उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे. सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यांमध्ये एसटी महामंडळाचे तब्बल ८३ लाख ५२ हजार प्रवासी कमी झाले आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ३४ कोटी असणारे दैनंदिन उत्पन्न सध्या ३१ कोटी ३२ लाख झाले आहे. अपेक्षित उत्पन्नापेक्षा ते अडीच ते तीन कोटींनी कमी झाले आहे.
सततच्या पावसामुळे मार्ग तात्पुरते बंद करावे लागले. अनेक बस फेऱ्यांचे रद्दीकरण व मार्गवापर बदलण्याच्या कारणाने एसटीचे दररोजचे प्रवासी आणि महसूल प्रभावित झाला आहे. सातत्याने आलेल्या जोरदार पावसामुळे, बीड, लातूर आणि धाराशिव यासारख्या मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये तसेच सोलापूरमध्ये अनेक बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या. वेळापत्रकात बदल करावे लागले. गणपती-दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबर महिन्यामध्ये एसटीला दैनंदिन उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित होती. सरासरी दैनंदिन उत्पन्न ३४ कोटी मिळण्याचा अंदाज होता. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये प्रवासीसंख्येत दररोज सरासरी चार लाखांची घट झाली आहे. जून, जुलै, ऑगस्ट या पावसाळी महिन्यांमध्ये एसटीचे उत्पन्न हे एकूण वार्षिक सरासरी उत्पन्नापेक्षा कमीच असते. परिणामी सप्टेंबरपासून येणाऱ्या सण-उत्सवांमुळे एसटीचे उत्पन्न हळूहळू वाढू लागते. सध्या दरमहिन्याचा खर्च भागवण्यासाठी एसटीला अंदाजे ३४ कोटी रुपये दरमहा उत्पन्न येणे गरजेचे आहे; परंतु गेले तीन महिने सातत्याने ३ ते ४ कोटी रुपये प्रतिदिन एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यात अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यास एसटीला कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडे हात पसरावे लागणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.