मुंबई

मुंबई परिसरात संततधार

CD

मुंबई परिसरात संततधार
आज मुसळधार पावसाचा अंदाज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः प्रादेशिक हवामान विभागाने रविवारी (ता. २८) अतिवृष्‍टीचा इशारा दिल्याने पालिका यंत्रणा सज्ज झाली हाेती. शनिवारी (ता. २७) मध्यरात्रीपासून जाेरदार सरी सुरू हाेत्या. रविवारी दुपारपर्यंत हा जोर कायम होता. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने इशारा ‘यलो अलर्ट’मध्ये बदलण्यात आला. कुलाबा, दिंडोशी भागात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. मुंबईतील रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू हाेती. हवामान विभागाने सोमवारी (ता. २९) मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

मुंबईत दिवसभरात कुलाबा वेधशाळेत ९३.२ मिलिमीटर तर सांताक्रूझमध्ये ५४.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हिंदमाता, गांधी मार्केट, चुनाभट्टी, मालाड, दहिसर, मानखुर्द भुयारी मार्ग यांसह अनेक सखल भागांत उपसा पंप सुरू करण्यात आले आहेत. शहर व उपनगरांतही पाणी तुंबल्याच्या तक्रारी नाहीत. शहरात झाडे पडण्याच्या सहा तक्रारी, तर शॉर्टसर्किटच्या सहा घटना नोंदवण्यात आल्या, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी व्यवस्था व उदंचन केंद्रांवर विशेष नजर ठेवली जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
----
अंधेरी भुयारी मार्गात पाणी
जाेरदार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतूक काही वेळ बंद ठेवण्यात आली हाेती. गांधी मार्केट आणि हिंदमाता परिसरात पाणी साचले नाही. त्यामुळे पालिका प्रशासनाने ही सुटकेचा निःश्वास सोडला.
.........
मुसळधार पावसाचा इशारा
कुलाबा वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (४०-५० किमी प्रतिताशी) वाहतील. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे.
.......
सर्वाधिक पाऊस कुठे?
शहरात कुलाबा अग्निशमन केंद्र परिसरात सर्वाधिक १०३ मिमी, तर भायखळ्यात १५ मिमी पाऊस झाला. उपनगरांत पवई, मुलुंड, चेंबूर येथे ७७ ते ९५ मिमी पावसाची नोंद झाली. पश्चिम उपनगरांत दिंडोशी (१०२ मिमी), बोरिवली (९७ मिमी) आणि मालाड (८०-१०१ मिमी) परिसरात मुसळधार पाऊस झाला.
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK Final : भारताने पाकड्यांना ठेचले! २१ दिवसांत तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून जिंकला आशिया चषक; शेजारी तोंड लपवताना दिसले

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

Sharad Pawar: ‘शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी: ज्येष्ठ नेते शरद पवार; अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान

Palghar Rain: पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जनजीवन विस्कळीत

SCROLL FOR NEXT