मुंबई

आम्ही लाडक्या बहिणी नाही का?

CD

आम्ही लाडक्या बहिणी नाही का?
बेघर महिलांचा सरकारला सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : आम्ही रस्त्यावर राहणारे भटके-विमुक्त असल्याने आमच्याकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतात. त्यामुळे आम्हाला ‘लाडकी बहीण’ यासारख्या योजनांचा लाभ घेता येत नाही. आम्हीसुद्धा लाडक्या बहिणी आहोत, मग सरकार आमचा सहानुभूतीने विचार का करत नाही, असा सवाल रस्त्यावरील बेघर महिलांनी सरकारला केला आहे.
पश्चिम उपनगरातील उघड्यावर आणि रस्त्यालगत राहणाऱ्या बेघर श्रमिक महिलांसाठी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्ट येथे सीपीडी संस्थेच्या वतीने एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात भटके-विमुक्तांच्या सामाजिक संवेदना यात्रेच्या कार्यकर्त्या ललिता धनवटे यांनी महिलांना आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा आणि हक्कदारीबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, पिढ्यान्‌पिढ्या रस्त्यावर आयुष्य घालवले असले तरी आपल्या मुलांचे भविष्य चांगले व्हावे, यासाठी महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करून शिक्षण व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा.
बेघर महिलांकडे बँक खाते, आधार कार्ड व वास्तव्याचे कागदपत्र नसल्याने त्या लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली. खरी गरज आमची आहे, मग आमच्यासाठी स्वतंत्र योजना का तयार होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
पाणी हक्क समितीचे प्रवीण बोरकर यांनी रस्त्यावरील महिलांना पाण्यासाठी होणाऱ्या हालअपेष्टा मांडल्या. ते म्हणाले, संविधानिक पाणी अधिकारासाठी अजून संघर्ष करावा लागेल. मुंबई महापालिकेच्या शहर व्यवस्थापक विभा जाधव यांनी महिलांना स्वयंसहाय्यता बचत गट व स्वावलंबन योजनांद्वारे सक्षम करण्यासाठी पालिका मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.
सीपीडी संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर यांनी माहिती दिली की, शिबिरातून निघालेल्या मागण्यांचे निवेदन महिला व बालकल्याण मंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना शिष्टमंडळाद्वारे देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी योगेश बोले, कोमल खडसे, खुषी जयस्वाल आणि महादेवी पवार यांनी विशेष मेहनत घेतली.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT