मुंबई

मुंबईत११ दिवसात साडे दहा हजार वाहनांची नोंदणी

CD

मुंबईत १० दिवसांत साडेदहा हजार वाहनांची नोंदणी
दुचाकी खरेदीकडे कल कायम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन गाडी, सोने-घर आणि इतर वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. हीच परंपरा मुंबईकरांनी यंदाच्या नवरात्री आणि दसऱ्यालादेखील जपली आहे. यंदा मुंबईकरांनी १० दिवसांत एकूण १० हजार ५४१ नवीन वाहनांची खरेदी केल्याचे मुंबईतील चारही आरटीओमधील नोंदीवरून समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक सात हजार ५९१ दुचाकींचा समावेश आहे.
गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा हे तीन आणि दिवाळीचा पाडवा हा अर्धा असे एकुण साडेतीन मुहूर्त आहेत. या मुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी गाडी, घर आणि सोने खरेदी मोठ्या प्रमाणात होते. दसऱ्याला दारात नवीन गाडी आणण्यावर नागरिकांचा मोठा भर असतो. या दिवशी दारात नवीन गाडीची पूजा करावी, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. त्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावरच गाडी मिळावी यासाठी नागरिक वाहनविक्रेत्यांकडे तगादा लावतात, परंतु गेल्या काही वर्षांपासून दसऱ्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी एक-दोन दिवस आधी गाडी दारात आणण्यात येते.
---=
चारचाकीपेक्षा दुचाकीला जास्त पसंती
मुंबईत सुरू असलेली विविध विकासकामे, रस्त्यांची स्थिती, वाहतूक कोंडी, पार्किंगची बोंब यामुळे मुंबईकरांनी चारचाकीपेक्षा दुचाकीला जास्त पसंती दिली आहे. दुचाकी खरेदीकरिता कमी डाऊनपेमेंट, कमी वेळात कर्ज उपलब्ध होते, त्यामुळे नागरिकांनी दुचाकी खरेदीला प्राधान्य दिल्याचे बोलले जात आहे.
------
वाहन नोंदणी ( २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर )
आरटीओ - कार -बाइक - एकूण
मुंबई सेंट्रल -८३५ -२२४३ -३०७८
वडाळा -७२३ -१६८७ -२४१०
अंधेरी -५४२ -१२८५ -१८३९
बोरिवली -८५० - २३६४ - ३२१४
एकूण - २९५० - ७५९१- १० हजार ५४१
=========

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT