मुंबई

लाचखोरांवरील कारवाई महाराष्ट्र आघाडीवर

CD

लाचखोरांवरील कारवाईत महाराष्ट्र आघाडीवर
राज्यात २८ टक्के सापळे; तज्ज्ञांकडून स्वागत


मुंबई, ता. ५ : भ्रष्टाचारविरोधी यंत्रणांनी देशभर केलेल्या कारवायांपैकी सर्वाधिक २८ टक्के कारवाया महाराष्ट्रात झाल्या आहेत. याकडे राज्य पोलिस दलातील आजी-माजी आयपीएस अधिकारी सकारात्मकपणे पाहतात. भ्रष्टाचार, लाचखोरी महाराष्ट्रातील नागरिकांच्या अंगवळणी पडलेली नाही. उलट नागरिक लाचखोर शासकीय अधिकाऱ्यांविरोधात निर्भीडपणे तक्रार देतात हे स्वागतार्ह आहे, अशा प्रतिक्रिया ते नोंदवतात.

‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार २०२३मध्ये देशातील २८ राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अन्य यंत्रणांनी एकूण २,८७५ सापळे रचून लाचखोर अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्यातील सर्वाधिक ७९५ कारवाया या महाराष्ट्रात करण्यात आल्या. विशेष म्हणजे ईशान्य भारतातील आठ राज्यांपैकी आसाम, सिक्कीम सोडल्यास अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, त्रिपुरा आणि नागालँड या सहा राज्यांत एकही सापळा कारवाई झालेली नाही. आसाममध्ये ९१ तर सिक्कीममध्ये अवघी एक कारवाई झाल्याचे या अहवालात नमूद आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि गोवा या तुलनेने मोठ्या राज्यांमध्येही सापळा कारवाई शून्य आहे.


राज्याचे निवृत्त महासंचालक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे माजी महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी या आकडेवारीकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. या आकडेवारीचा अर्थ असा, की अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यातील नागरिकांना भ्रष्टाचार, लाचखोरी मान्य नाही. म्हणून त्यांनी तक्रारी केल्या. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागानेही संवेदनशीलपणे तक्रारींआधारे कारवाई केली, असे त्यांनी सांगितले. मुळात राज्यात एका वर्षात १,२०० ते १,४०० सापळा कारवाया झालेल्या आहेत. त्यातुलनेत २०२३ची कारवाई निम्म्याभर आहे. त्यामुळे नागरिकांना एसीबीला या कारवाया वाढवण्यास वाव आहे. तसेच न्यायव्यवस्थेने अशा कारवाया गांभीर्याने घेत खटले झटपट निकाली काढून दोषींना शासन केल्यास तक्रारींचे, कारवायांचे प्रमाण आणखी वाढू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

२०२५ ऑक्टोबरपर्यंत ५३० कारवाया
महाराष्ट्रात या वर्षी २ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ५३० कारवाया करण्यात आल्या. त्यात ७८५ शासकीय कर्मचारी आणि खासगी व्यक्तींना अटक करण्यात आली. सर्वाधिक कारवाया नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आल्या. तर सर्वात कमी कारवायांची नोंद मुंबईत करण्यात आली.


कारवाईची आकडेवारी
राज्य सापळे टक्केवारी
महाराष्ट्र ७९५ २८
राजस्थान २८४ १०
कर्नाटक २४५ ९
गुजरात १८३ ६
एकूण २८७५ १००


परिक्षेत्रनिहाय आकडेवारी
मुंबई ३२
ठाणे ७०
पुणे ८६
नाशिक १०९
नागपूर ४४
अमरावती ५८
छत्रपती संभाजीनगर ८९
नांदेड ४२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

दुर्दैवी घटना! 'सख्ख्या काकाच्या पिकअपखाली सापडून चिमुरड्याचा मृत्यू'; आंबेगाव तालुक्यातील घटना, कुटुंबीयांचा आक्रोश

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

SCROLL FOR NEXT