भोईवाड्यात चार महिने कोंडी
भूमिगत जलवाहिनीच्या कामाचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : भोईवाडा वाहतूक विभाग हद्दीतील गोविंदजी केणी मार्गावर महापालिकेकडून भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खाशाबा जाधव मार्ग, व्ही. एल. पेडणेकर मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होणार आहे. पुढील चार महिने हा बदल लागू असणार आहे. दरम्यान, वाहनचालकांनी या बदलाची व व्यवस्थेची नोंद घ्यावी आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले.
---
पर्यायी वाहतूक अशी...
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाकडे जाणारी वाहने गोविंदजी केणी मार्गावरून डावीकडे वळून खाशाबा जाधव मार्गावरून इच्छित स्थळी जातील.
- जी. डी. आंबेकर मार्गाकडे जाणारी वाहतूक व्ही. एल. पेडणेकरमार्गे उजवीकडे वळून खाशाबा जाधव मार्गावर आणि पुढे डावीकडे वळून गोविंदजी केणी मार्गावरून इच्छित स्थळी जातील.