मुंबई

नागरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनासाठी करार

CD

नागरी सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनासाठी करार
मुंबई, ता. ७ : भारतातील नागरी सहकारी बँकांची शिखर संस्था असलेल्या नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. ने या क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि. सह सामंजस्य करार केला आहे.
नागरी सहकारी बँकांना सुरक्षित आणि नियमांचे पालन करणाऱ्या डिजिटल जाळ्याने सक्षम करणे हा या भागीदारीचा उद्देश आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात आधार-सक्षम ई-केवायसी, ई-साइन, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स, डिजिलॉकर इंटिग्रेशन, ई-स्टॅम्प सेवा, क्लाउड होस्टिंग, डेटा सेंटर व्यवस्थापन आणि सायबरसुरक्षा उपाययोजना यांचा समावेश असेल. पुढील टप्प्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल बँकिंग, किऑस्क-आधारित सेवा आणि डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म्स सुरू करण्यात येतील.
एनयूसीएफडीसी आपल्या सदस्य नागरी बँकांमध्ये या उपक्रमाचा स्वीकार सुलभ करेल, तर सीएससी एसपीव्ही प्लॅटफॉर्म्स, एपीआय आणि कामकाजातील साह्य देईल. अंमलबजावणी आणि क्षमता विकासावर देखरेख करण्यासाठी संयुक्त टीम काम करेल. करारामध्ये प्रशिक्षण, अनुपालन सहाय्य, तक्रार निवारण आणि डेटा संरक्षण उपाययोजनांचाही समावेश आहे, असे एनयूसीएफडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभात चतुर्वेदी म्हणाले, या सहकार्यामुळे “नागरी सहकारी बँका लाखो ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने, पारदर्शकतेने आणि नियमांचे पालन करून सेवा देऊ शकतील, असेही त्यांनी सांगितले, तर या करारामुळे सहकारी बँकांना तळागाळातल्या लोकांना सेवा देता येईल, असे सीएससी एसपीव्हीचे ग्रुप प्रेसिडेंट भगवान पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Supriya Sule : सरन्यायाधिशांवरील हल्ल्याची संसदेत चर्चा घडवून आणा; खासदार सुप्रिया सुळेंची मागणी

Pune News : मतदार यादीच्या विभागणीची जबाबदारी दोन अधिकाऱ्यांवर

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरु

Abhishek Sharma ची 'ती' एक गोष्ट ब्रायन लाराला खूप भावली; म्हणाला, ट्वेंटी-२०त मैदान गाजवतोय, पण...

शाहरुख स्क्रिप्टमध्ये इतका गुंतलेला असायचा की... निवेदिता यांनी सांगितली 'किंग अंकल'ची आठवण; म्हणाल्या- जॅकी श्रॉफ आणि मी...

SCROLL FOR NEXT