मुंबई

समाजभान विसरून नियमबाह्य आतषबाजी

CD

समाजभान विसरून नियमबाह्य आतषबाजी
तक्रारी करूनही पोलिसांची बघ्याची भूमिका; नागरिकांच्या समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया
मुंबई, ता. २३ ः यंदाच्या दिवाळीत सामाजिक भान विसरून नियम धाब्यावर बसवत मुंबईकरांनी पहाटेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी करत सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले. विशेष म्हणजे ही नियमबाह्य आणि जाचक आतषबाजी पोलिसांसमोर खुलेआम सुरू होती.
गेल्या तीन दिवसांत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री २, पहाटे ४ पर्यंत आतषबाजी सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी शहराच्या कानाकोपऱ्यातून प्राप्त झाल्या. पोलिसांच्या एक्स हँडलवर अनेकांनी त्या त्या वेळी कानठळ्या बसवणाऱ्या, धूर ओकणाऱ्या आतषबाजीची माहिती दिली, मात्र पोलिसांनी एकाही तक्रारीची गंभीर दखल घेत कारवाई केलेली नाही. शहरात नियमांचे उल्लंघन करून फटाके फोडल्याबद्दल एकही गुन्हा नोंद नाही.
नियमांनुसार रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत शहरात व घोषित शांतता क्षेत्रांच्या परिघात कर्कश लाऊडस्पीकर, कानठळ्या बसविणारे फटाके फोडण्यास मनाई आहे, मात्र समाजमाध्यमांवरील तक्रारींचा सूर पाहता मध्यरात्री २, पहाटे ४ या वेळेत शहराच्या कानाकोपऱ्यात आतषबाजी सुरू होती. या प्रत्येक तक्रारीवर संबंधित पोलिस ठाण्यास कळविण्यात आले आहे, असे छापील उत्तर मुंबई पोलिसांकडून देण्यात आले. अनेक ठिकाणी पोलिस गेले, तेवढ्यापुरती आतषबाजी थांबली. पोलिसांची पाठ फिरताच ती पुन्हा सुरू झाल्याचे या तक्रारीत नमूद आहे.
मुंबई पोलिसांनी गेल्या दोन आठवड्यांत रस्त्यावर फटाके विकणाऱ्या फेरीवाल्यांवर अनेक कारवाया केल्या. फटाके फोडणाऱ्यांना मात्र सूट दिली, असा सूर या तक्रारींमधून उमटतो आहे. नागरी वस्तीत मध्यरात्री, पहाटेपर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीने सर्वसामान्य रहिवाशांना विशेषतः वृद्ध, हृदयविकाराने त्रस्त, गरोदर महिला, लहान बालकांसह पाळीव व भटक्या जनावरांना सर्वाधिक झळ पोहोचली.
याबाबत मुंबई पोलिस दलाचे प्रवक्ता राज तिलक रोशन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. व्हॉट्सॲप मेसेज करून गेल्या तीन दिवसांत नियम धाब्यावर बसवून फटाके फोडणाऱ्या किती जणांवर कारवाई केली, याबाबत विचारणा केली असता त्यांनी उत्तर देणे टाळले.
मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या आतषबाजीवर आपल्यालाही अनेक तक्रारी, माहिती मिळाल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सुमेरा अब्दुलाली यांनी स्पष्ट केले. रात्री १० नंतर फटाके वाजवण्यास मनाई आहे, याची जाणीव प्रत्येकाला आहे, मात्र कारवाईच होणार नाही, याची खात्री पटल्यास सामूहिकरीत्या नियमभंग होतो, शिवाय शहराची लोकसंख्या पाहता अवघ्या पाच टक्के नागरिकांनी नियमभंग केला तरी त्याचा परिणाम भयंकर होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.

कोट
शहरात फटाक्यांमुळे किती, कसे परिणाम होतात याची जाणीव सरकारला आहे, मात्र तरीही नियमांचे पालन व्हावे, ही सरकारची इच्छाशक्ती नाही. यंदाची परिस्थिती पाहता सरकारनेच त्यास छुपी परवानगी दिली की काय, असा प्रश्न पडतो.
- सुमेरा अब्दुलाली
संस्थापक, आवाज फाउंडेशन

नागरिकांनी कारवाईची आस सोडली
चारकोपमधील एका इमारतीत नवरात्रीचा दांडिया आणि दिवाळीचे फटाके फोडणे रात्री १० नंतर सुरू झाले, अशी तक्रार करणाऱ्या एका एक्स वापरकर्त्याला पोलिसांनी नेमका पत्ता विचारला. त्यावर त्याने नेमका पत्ता देऊन काय फायदा, असा प्रश्न विचारला. पुनिता तोरसकर यांनी पोलिस १००, १०३, ११२ या हेल्पलाइनवर कोणीच फोन उचलत नाही, असे म्हटले. मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिसांचे एक्स हॅण्डल व्यक्तिरिक्त ती ती पोजिस ठाणी आणि उपआयुक्तही एक्सवर आहेत, मात्र त्यावरही तक्रार करून काहीच फायदा नाही, अशी पोस्ट जीत मश्रू या नावे एक्स खाते असलेल्या व्यक्तीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT