मुंबईत दररोज सहा टन सॅनिटरी कचरा गोळा
सहा महिन्यांत ५८६ टन संकलन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : महापालिकेच्या सॅनिटरी कचरा गोळा करण्याच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून, एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या सहा महिन्यांत एकूण ५८६ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. दररोज सरासरी सहा टन कचरा गोळा केला जात आहे.
या काळात सात लाख घरांपर्यंत संपर्क साधण्यात आला असून, सुमारे २८ लाख लोकसंख्या या उपक्रमाखाली येते. प्रत्येक महिन्याची आकडेवारी पाहता मे महिन्यात २२ टन, जूनमध्ये ५८ टन, जुलैमध्ये १०४ टन, ऑगस्टमध्ये १३३ टन, सप्टेंबरमध्ये ११६ टन आणि ऑक्टोबरमध्ये १५१ टन असा कचरा जमा झाला आहे. सहा महिन्यांत ५८४ टनांहून अधिक कचरा संकलित झाला आहे.
महापालिकेच्या अहवालानुसार, एम पूर्व, बी, पी पूर्व, एन आणि पी दक्षिण हे वॉर्ड कचरा संकलन आणि नोंदणीत आघाडीवर आहेत. मात्र २१ वॉर्डांनी फक्त १० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. २५ वॉर्डांमधील तपासणीत १०० सोसायट्यांपैकी अर्ध्या सोसायट्यांमध्ये नियमित सेवा दिली जाते, तर उर्वरित ठिकाणी सेवा नसल्याचे आढळले.
महापालिकेने पुढील काळात नोंदणी वाढवणे, दररोजचा डेटा डॅशबोर्डवर टाकणे आणि वॉर्डनिहाय अहवाल तयार करणे यावर भर देण्याचे ठरवले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात कचरा जमा होणाऱ्या ठिकाणांसाठी स्वतंत्र व्यवस्थापन प्रणाली राबविण्याची तयारी सुरू आहे.
सध्या ३,८४० हाउसिंग कॉम्प्लेक्स, १,१८९ ब्युटी पार्लर, ३२७ शैक्षणिक संस्था आणि ४१ महिला वसतिगृहांनी नोंदणी केली असून, एकूण ५,३९७ नोंदणी पूर्ण झाल्या आहेत. पालिकेचा उद्देश मुंबईत सॅनिटरी कचरा आणि घातक कचऱ्याचे शाश्वत व्यवस्थापन करून स्वच्छ आणि आरोग्यदायी मुंबई घडविण्याचा आहे.
महिन्यानुसार आकडेवारी (मे ते ऑक्टोबर २०२५)
महिना /नोंदणी संकलित कचरा (टन)/ दररोजचे सरासरी संकलन (टन)
मे १,७३५/ २२०.८
जून १,८७४/ ५८२.३
जुलै ३,३२३/ १,०४४.१
ऑगस्ट ४,४०७/ १,३३३.५
सप्टेंबर ५,२४४/ १,१६३.८
ऑक्टोबर ५,३८८/ १,५१६.०
डॅशबोर्डवरील एकूण नोंदणी
३,८४० हाउसिंग कॉम्प्लेक्स
१,१८९ ब्युटी पार्लर
३२७ शैक्षणिक संस्था
४१ महिला वसतिगृह
एकूण नोंदणी : ५,३९७
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.