मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘उत्थान’ प्रकल्प

CD

महापालिकेच्या शाळांमध्ये ‘उत्थान’ प्रकल्प
गुणवत्ता सुधारण्यासाठी अदाणी फाउंडेशनचे सहकार्य

मुंबई, ता. ८ ः महापालिकेच्या शाळा दिवसेंदिवस पटसंख्यांअभावी संकटात सापडलेले असतानाच या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाने अदाणी फाउंडेशनची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि अंकज्ञान क्षमता वाढवण्यासाठी ‘उत्थान’ प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे.

महापालिका शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी पत्र जारी करून अदाणी फाउंडेशनचा हा उपक्रम राबविला जात असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकल्पातून विद्यार्थ्यांची साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये वाढवण्यासोबत शैक्षणिक गुणवत्ता विकासावरही भर दिला जाणार असून हा उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि निपुण भारत मिशनच्या उद्दिष्टांशी सुसंगत असून, पालिकेच्या शाळांमधील शिक्षण गुणवत्ता सुधारण्याच्या हेतूने राबवण्यात असल्याचे खरे यांनी नमूद केले आहे. दरम्यान, उत्थान प्रकल्पात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी साक्षरता वाढवणे, निपुण भारताशी सुसंगत चाचण्या घेणे आणि अभ्यासात आणि गुणवत्तेत मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपचारात्मक शिक्षण हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमातून २०२७च्या राष्ट्रीय सर्वेक्षणात मुंबई जिल्ह्याचा क्रमांक सुधारण्याचेही ध्येय ठेवले निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमात दहावीतील २२ हजार विद्यार्थ्यांसाठी गणित सराव पुस्तिकांचे वितरण आणि ‘आमची शाळा आदर्श शाळा’ स्पर्धा यांचाही समावेश आहे. अदाणी फाउंडेशनकडून प्रश्नपत्रिका, प्रशिक्षण, वाहतूक आणि डॅशबोर्ड तयार करण्याचा सर्व खर्च उचलला जाणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षांच्या कालावधीसाठी असून, त्यानंतर त्याचे पुनरावलोकन केले जाणार असल्याची माहितीही सुजाता खरे यांनी दिली.

शिक्षक संघटनांकडून विरोध
शालेय गुणवत्ता सुधारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे अनेक प्रकारच्या योजना आणि उपक्रम असताना अदाणी फाउंडेशनची गरज महापालिका प्रशासनाला का वाटली? या माध्यमातून प्रशासनाला या शाळा बंद करायच्या आहेत काय, असा सवाल विविध शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींकडून केला जात आहे.

..
परवानगीबाबत प्रश्‍नचिन्ह
पालिकेच्या ‘उत्थान’ उपक्रमाला राज्य शासनाची किंवा (एससीईआरटी) राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेची औपचारिक परवानगी आहे किंवा कसे, याबाबत पालिका शिक्षण विभागाकडून कोणतीही स्पष्टता नसल्याने एकूणच या उपक्रमावर प्रश्‍न उपस्थित होत असल्याचे बृहन्मुंबई शिक्षक सभेचे सरचिटणीस राजेंद्र मोहिते यांनी सांगितले.

अदाणी फाउंडेशनतर्फे चालवलेला जाणारा उपक्रम हा महाराष्ट्र शासनाच्या परवानगीने आहे किंवा नाही, याबाबत स्पष्टता नाही. सार्वजनिक क्षेत्रातील शिक्षण व शिक्षकांना बदनाम करण्याचा हा कट आहे की काय, अशी शंका उपस्थित होते. यामध्ये बालकांचा मोफत शिक्षण अधिकार अधिनियम २००९ याचे स्पष्टपणे उल्लंघन होताना दिसते.
- राजेंद्र मोहिते, सरचिटणीस, बृहन्मुंबई महापालिका शिक्षक सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT