मुंबई

अतिक्रमण हटवण्यासाठी नवी डिजिटल प्रणाली

CD

अतिक्रमण हटवण्यासाठी नवी डिजिटल प्रणाली
पालिका ४.२४ कोटी खर्च करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : महापालिका अतिक्रमण हटविण्यासाठी नवी डिजिटल प्रणाली सुरू करणार आहे. या प्रणालीच्या रचना, विकास आणि देखभालीचं काम मे. आर्सियस इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीकडे देण्यात आले असून, त्यासाठी ४.२४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
महापालिकेने २०१६ मध्ये ही प्रणाली सुरू केली होती, मात्र ती आता जुनी झाल्याने आणि तांत्रिक अडचणी वाढल्याने नव्या प्रणालीची गरज निर्माण झाली. नव्या प्रणालीत जीआयएस नकाशा, विश्लेषण, डॅशबोर्ड आणि माहितीचे इंटिग्रेशन या सुविधा असतील.
या प्रकल्पासाठी डिलॉइट सल्लागार संस्थेच्या मदतीने निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. एकूण सात कंपन्यांनी निविदा सादर केली, त्यात आर्सियस इन्फोटेकचा दर सर्वात कमी ठरला.
नव्या प्रणालीमुळे अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे. नागरिकांना ऑनलाइन तक्रारींची स्थिती पाहता येईल, तसेच महापालिका विभागांमध्ये समन्वय वाढेल.
हा प्रकल्प तीन वर्षे सहा महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केला जाणार असून, त्यात सहा महिन्यांत अंमलबजावणी आणि तीन वर्षांची देखभाल यांचा समावेश आहे. या कामासाठीचा निधी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महसूली तरतुदीतून केला जाणार आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : भारत-अमेरिका व्यापारी कराराविरोधात बीडमध्ये मोर्चा; देशव्यापी संपाला जोरदार पाठिंबा

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT