मुंबई

आता यात वाॅर्ड चोरी बघू नका!

CD

आता यात वाॅर्ड चोरी बघू नका!
आरक्षण सोडतीनंतर भाजपचा महाविकास आघाडीला चिमटा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून, या प्रक्रियेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्षांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता होती. कोणत्या पक्षाला कोणते वॉर्ड मिळाले, कुठे महिलांसाठी आरक्षण लागले, यावरून चर्चा आणि नाराजी दोन्ही वातावरणात दिसली. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी महाविकास आघाडीला थेट चिमटा काढत ‘‘आता यात वार्ड चोरी बघू नका!’’ अशा शब्दांत डिवचले आहे.
आरक्षण सोडतीनंतर प्रतिक्रिया देताना प्रभाकर शिंदे म्हणाले, ‘‘आरक्षण सोडत ही निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे आणि ती पूर्णतः पारदर्शक आहे. काहींना फटका बसतो, काहींना इच्छेनुसार वॉर्ड मिळतात. ज्यांना हवे तसे वॉर्ड मिळाले नाहीत ते इतर वॉर्डकडे पाहतात किंवा पक्षश्रेष्ठींशी बोलतात, मात्र अंतिम निर्णय पक्षाचा असतो.”
शिंदे यांनी पुढे म्हटले, “ही प्रक्रिया दरवेळी काहींच्या अपेक्षा पूर्ण करते, काहींच्या नाही, पण हा बदल स्वीकारायला हवा. यात कुणाला ‘वॉर्ड चोरी’ दिसू नये अशी आमची अपेक्षा आहे.”
भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनीही या सोडतीनंतर सूचक शब्दांत महाविकास आघाडीवर प्रहार केला. ते म्हणाले, “आरक्षण सोडत ही गेल्या २५ वर्षांपासूनची ठरलेली प्रक्रिया आहे. यात नवीन काहीही नाही. ज्यांचे वॉर्ड बदलले असतील किंवा आरक्षण बदलले असेल, त्यांना नवीन वॉर्डची नव्याने चाचपणी करावी लागेल.”
ते पुढे म्हणाले, “ही निवडणुकीची नियमित प्रक्रिया आहे. आता यात कुणाला वॉर्ड चोरी दिसली, तर त्यावर काही बोलणे व्यर्थ आहे. भाजपच्या मकरंद नार्वेकर यांनाही आरक्षणाचा फटका बसला आहे, पण त्यावर काय निर्णय घ्यायचा हे पूर्णपणे पक्षावर अवलंबून आहे.”
आरक्षण सोडतीनंतर आता महापालिका निवडणुकीच्या दिशेने राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोणत्या पक्षाकडून कोणत्या वॉर्डमध्ये उमेदवार उतरणार, कोणाला आरक्षणाचा फायदा होणार, यावर चर्चेचे वादळ उठले आहे. भाजपने मात्र स्पष्ट केले आहे की ,“आरक्षणानंतरचे गणित आम्ही स्वीकारतो, पण कुणी यामध्ये गैरव्यवहार शोधू नये. आम्ही विकासाच्या अजेंड्यावरच निवडणूक लढवू.”
महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर भाजपच्या प्रतिक्रियांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की,पक्ष आरक्षण प्रक्रियेला पाठिंबा देत असला तरी ‘वॉर्ड चोरी’सारख्या आरोपांवर आघाडी घेत महाविकास आघाडीला कोपरखळी देत आहे. आता येणाऱ्या काही दिवसांत उमेदवार ठरवणी आणि तिकीटवाटपातच खरी राजकीय सरशी पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

IND vs SA: टीम इंडियाला धक्का! दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वनडे मालिकेत स्टार फलंदाज खेळणार नाही, कारण...

Pune Traffic: कार्तिक यात्रेनिमित्त पुण्यात उद्या वाहतूक व्यवस्थेत बदल; पालखीमार्ग टाळण्याचं आवाहन

Pimparkhed News : बिबट्यांच्या हल्ल्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थांसाठी वनमंत्री गणेश नाईक उद्या भेटीस येणार !

Latest Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT