नवीन मतदारसंघाची शोधाशोध
आरक्षण सोडतीचा राजकीय दिग्गजांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ साठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी किंवा इतर प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यामुळे गटनेते, माजी महापौर, विरोधी पक्षनेत्यांना नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आली आहे.
शिवसेना नेते आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा प्रभाग क्रमांक २०९ पूर्वी सर्वसाधारण होता. नव्या रचनेनुसार सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे जाधव यांना नवीन प्रभाग शोधावा लागणार आहे. शिवसेनेचे मंगेश सातमकर (१७५) यांचा प्रभाग सर्वसाधारण महिला आरक्षित झाल्यामुळे त्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत. माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (पूर्वी काँग्रेस, सध्या भाजप) यांचा प्रभाग क्रमांक १७६ हा ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्यामुळे राजकीय गणित बिघडले आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या माजी गटनेत्या विशाखा राऊत (प्रभाग क्रमांक १९१) यांचा प्रभाग ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने नवा प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.
-------------------------------
प्रभाग २२७ - भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर (प्रभाग २२७) यांचा प्रभाग आता सर्वसाधारण महिला राखीव.
प्रभाग ८५ - भाजपच्या ज्योती कळवणी प्रभाग ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने फटका बसला आहे.
प्रभाग १९६ - ठाकरे गटाचे आशीष चेंबूरकर यांचा प्रभाग सर्वसाधारण महिला.
प्रभाग १५३ - अनिल पाटणकर यांचा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे.
प्रभाग १७० - अजित पवार गटाचे कप्तान मलिक यांचा प्रभाग ओबीसी महिला आरक्षित.
प्रभाग १५० - काँग्रेस खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या पत्नी संगीता हांडोरे यांचा प्रभाग ओबीसी महिला आरक्षित.
---------------------------
भाजपला फटका
भाजप नेते विद्याधर सिंग (१३), कमलेश यादव (१), जगदीश कुट्टी ( ८२), मनोज कोटक (१०३), नील सोमैय्या (१०८) आणि अतुल शहा (२२०) यांचे प्रभाग महिलांसाठी किंवा ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्याने गणितात बदल झाला आहे.
------------------------
आरक्षण सोडतीमधील बदलांमुळे तरुण, नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे. आरक्षण सोडतीमुळे ही संधी चालून आली आहे.
ृः- हर्षल प्रधान, प्रवक्ते, शिवसेना (ठाकरे)
़ः---------------------------
मुंबई महापालिका निवडणुकीत अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना खुल्या प्रभागात खुल्या प्रभाग उमेदवारी मिळाली पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत १३ टक्के आरक्षणाप्रमाणात प्रभाग मिळालेले नाहीत. जातीनिहाय जनगणना होईल तेव्हा चित्र स्पष्ट होईल.
- भाई गिरकर, माजी समाजकल्याण मंत्री, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.