मुंबई

मुंबईचा गड शिंदेंनी राखला

CD

मुंबईचा गड शिंदेंनी राखला
भाजप-ठाकरे गटाला सोडतीचा फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : पालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव प्रभाग, अनुसूचित जाती-जमाती आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांना ताकद मिळाली आहे. या सर्व घटकांमुळे ठाकरे गट आणि भाजपच्या अनेक दिग्गज नगरसेवकांना फटका बसला आहे, तर शिंदे गटाची निवडणूकपूर्व स्थिती अधिक मजबूत झाल्याचे चित्र निर्माण झाल्याने मुंबईचा गड राखल्याचे बोलले जात आहे.
शिवसेनेकडे मुंबईतील १२८ आजी-माजी नगरसेवकांची फौज आहे, त्यांपैकी तब्बल ६२ महिला नगरसेविका आहेत. महिला आरक्षणामुळे ही संख्या शिंदे गटासाठी थेट लाभदायक ठरली आहे. आरक्षण सोडतीत महिला नगरसेविकांचे प्रभाग पुन्हा महिलांसाठीच राखीव झाले आहे. त्यामुळे उमेदवार शोधण्यात शिंदे गटाला फारशी कसरत करावी लागणार नाही. शिवाय ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे निर्माण झालेले भावनिक नातं आणि शिवसेनेच्या महिला आघाडीचे मजबूत जाळे पाहता, ही सोडत शिंदे गटाला फायदा देणारी, तर प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकणारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-----------------------------
भाजपची गणिते बिघडली
महिला आरक्षणाने भाजपची गणिते बिघडवली आहेत. १४ विद्यमान भाजप नगरसेवकांचे प्रभाग महिलांसाठी राखीव झाले असून, मनोज कोटक, पराग शाह, अभिजित सामंत, मकरंद नार्वेकर यांसारखे वरिष्ठ नगरसेवक गारद झाले आहेत. याचा थेट परिणाम मुंबईतील प्रचारयंत्रणेवर होणार आहे.
़़़़़़़ः--------------------------
ठाकरे गटाला धक्का
ठाकरे गटाला सोडतीत फटका बसला आहे. ओबीसी महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रभाग क्रमांक १५३ मध्ये अनिल पाटणकर, तर अनुसूचित महिलांसाठी राखीव प्रभाग क्रमांक १५५ आणि १८६ मध्ये अनुक्रमे श्रीकांत शेट्ये आणि वसंत नकाशे यांचे प्रभाग गेले आहेत. याशिवाय रमेश कोरगावकर, सदानंद परब, आशीष चेंबूरकर यांसह सात विद्यमान नगरसेवकांचे प्रभाग खुल्या महिलांसाठी राखीव झाले आहेत.
----------------------------------
आरक्षण सोडतीकडे संधी म्हणून बघत आहोत. ज्या ठिकाणी आरक्षण बदलले आहे, तेथे नवीन आणि तरुण उमेदवारांना संधी दिली जाईल.
- हर्षल प्रधान, मुख्य प्रवक्ते, ठाकरे गट
........
आरक्षण सोडत ही निवडणूक प्रक्रियेचा एक भाग आहे. काही लोकांचे प्रभाग गेले असले तरी काही लोकांना संधीदेखील मिळणार आहे. भाजपची तयारी पूर्ण झाली असून, पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील.
- प्रभाकर शिंदे, माजी गटनेते, भाजप
........
जनतेमध्ये काम करणारा आमचा पक्ष आहे. प्रभाग बदलल्याने काही फारसा फरक पडत नाही. जनतेतील काम महत्त्वाचे असते. या निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहोत.
- राखी जाधव, मुंबई अध्यक्ष, शरद पवार गट
.........
आरक्षण सोडत ही निवडणूक प्रक्रिया असून, तिचा आम्ही स्वीकार करतो. सर्वच राजकीय पक्षांना त्याचा फटका बसत असतो, मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याचे समाधान आहे.
- सुरेशचंद्र राजहंस
........

महिला आता कोणत्याही काळजीशिवाय रात्रीची ड्युटी करू शकतात! राज्य सरकारचा मोठा निर्णय, पाहा संपूर्ण नियमावली

Chikhli Crime : चिखलीत कौटुंबिक तणाव हिंसक वळणावर; मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा!

Latest Marathi Breaking News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पहिलीच बैठक पार

Pune News : कचरा वाहतुकीची क्षमता वाढणार; अतिरिक्त आयुक्त पुनवीत कौर यांनी दिले आदेश

Thane Traffic: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कधी फुटणार? 'तो' दिवस ठरला!

SCROLL FOR NEXT