हेस्टर बायोसायन्सेसला १४.३३ कोटींचा नफा
अहमदाबाद, ता. १३ : लस आणि आरोग्य उत्पादने तयार करणारी पशू आरोग्य कंपनी, हेस्टर बायोसायन्सेस लि.ने या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत १४.३३ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. हा नफा मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नोंदवलेल्या ८.३९ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याच्या तुलनेत ७१ टक्के जास्त आहे. या तिमाहीत कंपनीला कामकाजातून ७०.९७ कोटी रुपये महसूल मिळाला.
एकत्रित निकालांमध्ये नेपाळ आणि टांझानियातील उपकंपन्यांचे कामकाज समाविष्ट आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा ३१.६३ कोटी रुपये नोंदवण्यात आला, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील १५.८८ कोटी रुपयांपेक्षा ९९ टक्के अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२६ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने १५५.०७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. हेस्टर आफ्रिकेने आर्थिक वर्ष २०२६च्या दुसऱ्या तिमाहीत ४.८२ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२६च्या पहिल्या तिमाहीत १०.३२ कोटी रुपये निव्वळ नफा नोंदवला.