मुंबई

राज्यातील ८७ टक्के नागरिकांना तापमानवाढीचा फटका

CD

राज्यातील ८७ टक्के नागरिकांना तापमानवाढीचा फटका
येलच्या अहवालातून चिंताजनक वास्तव उघड

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : जागतिक तापमानवाढीचा तडाखा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर बसला असल्याचे येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशनच्या क्लायमेट ओपिनियन मॅप्स फॉर इंडियाच्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. राज्यातील तब्बल ८७ टक्के नागरिकांनी तापमानवाढीचा फटका बसल्याचे सांगितले असून, हा आकडा देशातील सर्वाधिक आहे. बदललेला मॉन्सून, पावसाचे अनियमित चक्र, पुराची तीव्रता आणि वाढती पाणीटंचाई यामुळे राज्यातील नागरिक त्यांच्या दैनंदिन जीवनात हवामान बदलाचे परिणाम थेट जाणवत असल्याचे चित्र समोर आले आहे.

‘येल’च्या अहवालानुसार, ७७ टक्के नागरिकांना जागतिक तापमानवाढीचा मॉन्सूनवर परिणाम जाणविल्याचे तर ८२ टक्के लोकांनी दुष्काळ आणि पाणीटंचाईचा प्रत्यक्ष अनुभव असल्याचे नोंदवले. राज्यभरात गेल्या काही वर्षांत मुसळधार पावसाच्या घटना, महापूर, दुष्काळ अशा दोन्ही टोकांच्या परिस्थितीमुळे हवामान बदलाचा थेट परिणाम लोकांना जाणवत आहे. राज्यात शहरीकरणाच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरिकरणामुळे मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांवर पावसाचा आणि उष्णतेचा ताण वाढतो आहे. ग्रामीण भागात पीकचक्र विस्कळीत होत असून शेतकऱ्यांना अनियमित मॉन्सूनचा मोठा फटका बसतो आहे. येलचे नकाशे भारतातील प्रादेशिक फरक स्पष्टपणे दाखवतात. एका बाजूला उत्तर भारतात ७८ ते ८० टक्के लोकांना उष्णतेच्या लाटा जाणवल्या, तर दक्षिण भारतातील केरळ आणि तमिळनाडूत हा अनुभव फक्त ५२ ते ५५ टक्के लोकांपर्यंत मर्यादित असल्याचे दिसते. चक्रीवादळांच्या बाबतीतही असाच फरक आढळतो. राष्ट्रीय स्तरावर फक्त ३५ टक्के लोकांनी असा अनुभव सांगितला असताना ओरिसातील तब्बल ६४ टक्के नागरिकांना चक्रीवादळांचा प्रत्यक्ष फटका बसला आहे.

क्लायमेट ओपिनियन मॅप्स हे २०२२ ते २०२५ दरम्यान देशभरातील १९,००० हून अधिक प्रतिसादकर्त्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहेत. मिळालेली माहिती एमआरपी (मल्टिलेव्हल रिग्रेशन विथ पोस्ट-स्ट्रॅटिफिकेशन) या अत्याधुनिक पद्धतीने मॉडेल करण्यात आली असून, सर्वेक्षणातील उत्तरे आणि भारतीय जनगणनेतील लोकसंख्यात्मक वैशिष्ट्यांची सांगड घालून राज्य व जिल्हास्तरीय अचूक अंदाज तयार करण्यात आले आहेत.


भारतातील हवामान बदलाचे परिणाम : प्रभावित होणाऱ्या नागरिकांची संख्या
- तीव्र उष्णतेच्या लाटा - ७१ टक्के
- शेतीतील रोगराई व कीड प्रादुर्भाव - ५९ टक्के
- वीजपुरवठा खंडित होणे - ५९ टक्के
- पाणीप्रदूषण - ५३ टक्के
- दुष्काळ, पाणीटंचाई - ५२ टक्के
- तीव्र हवा प्रदूषण - ५१ टक्के

भारत झपाट्याने विकसित होत असताना आणि वातावरणातील धोक्यांत वाढ होत असताना लोकांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेणे गरजेचे आहे. हे नकाशे निर्णयकर्त्यांना स्थानिक अनुभवांवर आधारित उपाययोजना करण्यास मदत करतील.
- डॉ. जगदीश ठाकर, प्रकल्पाचे सहलेखक

भारतात हवामान धोरणे लोकांच्या वास्तविक अनुभवानुसार ठरली पाहिजेत. माध्यमांनी जीवाश्म इंधन आणि हवामान घटनांतील संबंध स्पष्ट केल्यास लोकांची समज वाढू शकते.
- डॉ. जेनिफर मार्लन, मुख्य संशोधक, येल प्रोग्रॅम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT