मुंबई

अखेर सीएनजीची काेंडी फुटली

CD

अखेर सीएनजीची काेंडी फुटली

तिसऱ्या दिवशी पुरवठा सुरळीत; सहा लाख वाहनांना फटका 
सकाळ वृत्तसेवा 
मुंबई, ता. १८ :  गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या (गेल) वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर झाल्याने महानगर गॅसकडून हाेणारा सीएनजी पुरवठा तिसऱ्या दिवशी मंगळवारी दुपारी ३ नंतर सुरळीत झाला. त्यामुळे टॅक्सी, शालेय बससह सार्वजनिक वाहतुकीला  माेठा दिलासा मिळाला. तत्पूर्वी, दुपारपर्यंत पेट्राेलपंपाबाहेर काही किलाेमीटरपर्यंत रांग लागल्याचे दृश्य कायम हाेते. त्यामुळे सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे प्रचंड हाल झाले.

मुंबई शहर आणि परिसरात गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या आरसीएफ कम्पाउंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनमध्ये रविवारी तांत्रिक बिघाड झाला हाेता. त्यामुळे वडाळा येथील महानगर गॅसच्या सिटी गेट स्टेशनला (सीजीएस) होणारा गॅसपुरवठा बाधित झाला हाेता. सीएनजी पंपावरील गॅसचा शिल्लक साठा संपत आल्याने प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण हाेऊन रिक्षा, टॅक्सी वाहतुकीसह सार्वजनिक वाहतूक काेलमडली हाेती.

गेलची उपकंपनी महानगर गॅस लिमिटेड ही कंपनी महामुंबईतील १० लाखांहून अधिक वाहनांना सीएनजी आणि २० लाखांहून अधिक घरांत स्वयंपाकासाठी तसेच कारखान्यांना औद्योगिक वापरासाठी पीएनजीचा पुरवठा करते. वडाळा येथील ज्या सीजीएस केंद्रातून हा पुरवठा हाेताे, त्याच्या वाहिनीत बिघाड झाल्याने मुंबई आणि परिसरात गाेंधळ उडाला हाेता. मुंबईत महानगर गॅसकडून ४८० पंपांना सीएनजीचा पुरवठा होतो. या पंपांना मंगळवारी दुपारपासून सीएनजीचा पुरवठा सुरू झाला आहे. सीएनजीअभावी हजारो रिक्षा-टॅक्सी, ओला-उबर व्‍यावसायिकांचे तीन दिवसांचे उत्पन्न बुडाले. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सीएनजी इंधन पंपांना होणारा सीएनजीचा पुरवठा दुपारी ३.३० ते ४च्या दरम्यान  पूर्ववत झाला. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल)कडून महानगर गॅसला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणाऱ्या मुख्य वायुवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली, असे महानगर गॅसच्या वतीने सांगण्यात आले.
--------------
 मुंबई महानगरातील सीएनजीचा पुरवठा  मंगळवारी दुपारी ३ वाजता  सुरळीत सुरू झाला. टप्प्याटप्प्याने सर्व पेट्रोलपंपावरील सीएनजीचा पुरवठा सुरू झाला आहे.
 - चेतन मोदी, अध्यक्ष, मुंबई पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन
---------------------------
मुंबई महानगरात चार लाख रिक्षा आहेत. तीन दिवस प्रत्येक रिक्षा आणि टॅक्सीचालकांचे प्रतिदिन एक हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याची भरपाई महानगर गॅसने द्यायला हवी. तीन दिवसांच्या नुकसानीची रक्कम रिक्षा-टॅक्सी महामंडळात जमा करावी. 
- के. के. तिवारी, अध्यक्ष, भाजप रिक्षा टॅक्सी सेल
== 
शालेय बसना फटका
महानगर गॅस लिमिटेड कंपनीच्या आरसीएफ कम्पाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाइपलाइनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्याला दुरुस्तीसाठी तीन दिवस लागले आहेत. यात एकाच कंपनीची मोनोपॉली असल्याने या समस्या येत आहेत. दोन हजारांहून अधिक शालेय बसला त्याचा फटका बसला आहे, असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष  अनिल गर्ग यांनी सांगितले.
==
प्रतिदिन सुमारे ५० काेटींचे नुकसान
मुंबई महानगर क्षेत्रात तीन लाख ओला-उबरचे चालक  आहेत. त्यापैकी दोन लाख गाड्या सीएनजीचा पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवस बंद होत्या. चालकांना १८०० ते २५०० रुपयांचे प्रतिदिन नुकसान झाले आहे, असे राष्ट्रीय कामगार संघाच्या ॲपबेस ट्रान्सपोर्ट युनिटचे अध्यक्ष रिझवान शेख यांनी सांगितले.   
==
औद्याेगिक पुरवठ्याचे काम सुरू
 महामुंबईतील सीएनजी इंधन पंपांना होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. घरगुती पीएनजी गॅसच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता. औद्योगिक आणि व्यापारी आस्थापनांचा नैसर्गिक वायूचा पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे, असे महानगर गॅसने म्हटले आहे. 
===
तीन दिवसांत बंद गाड्या
रिक्षा : ४ लाख
ओला-उबर : २ लाख
टॅक्सी : २५ हजार
शालेय बस : २ हजार
===

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT