थकीत मालमत्ता कर भरा अन्यथा मालमत्तांच्या जाहीर लिलाव
थकबाकीदारांना पालिकेच्या नोटिसा; २१ दिवसांत कर भरण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी स्थावर मालमत्तांचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय महापालिका करनिर्धारण व संकलन खात्याने घेतला आहे. महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम २०६(२) नुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. विविध भागातील जमिनी, गोदामे, व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आणि निवासी वापरात असलेल्या मालमत्तांचा यात समावेश आहे.
महापालिकेने जाहीर केलेल्या नोटिशीनुसार संबंधित मालमत्ता धारकांनी थकीत मालमत्ता कर तसेच लागू शुल्क नोटीस जाहीर झाल्यापासून २१ दिवसांच्या आत भरावे अन्यथा संबंधित मालमत्तांवर लिलावाची कारवाई करण्यात येईल. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, कर थकवून बसलेल्या मालमत्ताधारकांना अंतिम संधी म्हणून ही मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कोणतीही शिथिलता दिली जाणार नाही, असे बजावले आहे.
संबंधित मालमत्ता या व्यावसायिक वापरातील कार्यालये, गोदामे, औद्योगिक युनिट्स, भूखंड, हॉटेल्स तसेच निवासी जमिनी अशा विविध प्रकारच्या आहेत. अनेक मालमत्तांवर दीर्घकाळापासून मोठ्या प्रमाणात कर थकीत असून, कर वसूल करण्यासाठी आणि महसूल वाढवण्यासाठी महापालिकेने लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मालमत्ता कर हा महापालिकेचा सर्वात महत्त्वाचा उत्पन्नाचा स्रोत आहे. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महापालिकेने मालमत्ता कर थकबाकी वसूल करण्यावर अधिक जोड देण्याचे ठरवले आहे. सुरुवातीला व्यावसायिक थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. यासाठीची नोटीस महापालिकेने उप करनिर्धारक व संकलक यांच्या सहीनिधी जारी केली असून, मालमत्ताधारकांनी दिलेल्या मुदतीत कर भरून लिलावाची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
थकबाकीदारांची यादी - नावे व थकबाकी रक्कम
१. एम/एस जयंंत ऑईल मिल्स
थकबाकी : १,४१,९१,०८०
२. लमण रघुनाथ शेट्ये व गोपाळ पुंडलिक शेट्ये (विश्वस्त)
थकबाकी : ८९,१५,९८८
३. श्री वसंतराव दत्ताजी धनवताय व इतर
थकबाकी : १,६८,५३,२२७
४. भिखाभाई एन. उपाध्याय, सौ. बचूभाई, दासचो अँड कंपनी व इतर
थकबाकी : २५,००,२८,२०४
५. एम/एस समीर पार्क्स अॅण्ड अम्यूझमेंट्स प्रा. लि.
थकबाकी : ३,२३,०३,९३८
६. हॉटेल इम्पीरियल पॅलेस
थकबाकी : ७,२९,२७,४६३
७. एम/एस वीकेलाल इन्व्हेस्टमेंट कंपनी / राम रघू भोर
थकबाकी : २,४१,६९,३२९
............
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.