मुंबई

मुंबईच हवा धोकादायक

CD

मुंबईची हवा धोकादायक
अनेक भागांत एक्यूआय भीषण पातळीवर; उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईत थंडीची चाहूल लागताच हवेची गुणवत्ता पुन्हा खालावू लागली आहे. शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) सतत ‘वाईट’ श्रेणीत नोंदवला जात असून, बुधवारी (ता. १९) अनेक ठिकाणी एक्यूआय २०० ते २७०च्या धोकादायक पातळीवर पोहोचला. हवेतील प्रदूषण वाढल्याने श्वसनाचे त्रास, खोकला, ॲलर्जी आणि डोळ्यांची जळजळ यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या रुग्णालयांत वाढू लागली आहे.
महापालिकेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. महापालिकेने बांधकामांमधून होणारे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक विभागांत विशेष धूळ नियंत्रण पथके तयार केल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात वाढत चाललेल्या प्रदूषणाची वाढलेली पातळी पाहिली असता या पथकांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयआयटीएम आणि महापालिकेच्या केंद्रांनी नोंदवलेले एक्यूआय चिंता वाढणारे आहेत. सर्वाधिक खराब हवेचा स्तर देवनार २७४, माझगाव २४० आणि शिवाजीनगर २३३ येथे नोंदवला गेला आहे. मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि मुंबई भाजपचे उपाध्यक्ष रवी राजा यांनी महापालिकेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले, ‘‘शहराची हवा इतकी खराब असताना महापालिकेच्या वॉर्ड टीम नेमके काय करीत आहेत? बांधकामांमधून उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. मोठ्या प्रकल्पांच्या ठिकाणी धूळ मोठ्या प्रमाणात उडते; त्यावर ठोस कारवाई का होत नाही,’’असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील हवा पुन्हा एकदा नागरिकांसाठी धोक्याची ठरत असून, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

...
एक्यूआय
देवनार – २७४ (अत्यंत वाईट)
माझगाव – २४० (अत्यंत वाईट)
शिवाजीनगर – २३३ (अत्यंत वाईट)
मालाड – २२६ (वाईट)
वरळी – २०९ (वाईट)
खेरवाडी (वांद्रे) – १३९ (मध्यम)
कांदिवली – १४९ (मध्यम)
घाटकोपर – १५८ (मध्यम)
चेेंबूर – १४२,
बीकेसी – १३५ (मध्यम)
विलेपार्ले – १२१ (मध्यम)
कुर्ला – ११० (मध्यम)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Latest Marathi Breaking News Live Update: महापालिका निवडणुकीत ‘महाआघाडी’चे संकेत

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

Akola Crime : अल्पवयीन चोरट्याकडून २१.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त; घरफोडी प्रकरणाचा वेगवान उलगडा

SCROLL FOR NEXT