मुंबई

मुंबई शिक्षक पात्रता परीक्षा सुरळित

CD

मुंबईत शिक्षक पात्रता परीक्षा सुरळीत

केंद्रांवर बायाेमेट्रिक हजेरी; एक हजार १४६ उमेदवारांची दांडी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : भावी शिक्षकांना शिक्षक होण्यासाठी अत्यावश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी मुंबई आणि परिसरात काही अपवाद वगळता सुरळीत पार पडली. मुंबई आणि परिसरात या परीक्षेला नोंदणी केलेल्या १२ हजार ५८१ उमेदवारांपैकी ११ हजार ४४२ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. उर्वरित एक हजार १४६ उमेदवारांनी या परीक्षेला दांडी मारल्याचे दिसून आले.

राज्य परीक्षा परिषदेसह शालेय शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही परीक्षा सुरळीत होण्यासाठी यापूर्वीच प्रशिक्षण देण्यात आल्याने कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक उमेदवाराची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. यामुळे परीक्षा केंद्रांवर कोणतीही साधने नेण्यास प्रतिबंध केल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.

टीईटीची ही परीक्षा मुंबई शिक्षण उपसंचालक कार्यालयांअंतर्गत येणाऱ्या तीन विभागांतील १८ परीक्षा केंद्रांवर सकाळी आणि दुपारच्या सत्रात दोन पेपरसाठी घेण्यात आली. मुंबई आणि परिसरात टीईटीची परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी राज्य परीक्षा परिषदेने अत्यंत चोख व्यवस्था केली होती. परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले होते. परीक्षेच्या दिवशी उमेदवारांना एक तास अगोदर उपस्थित राहण्याचे बंधनकारक करण्यात आले होते. यासोबत परीक्षा परिषदेच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथकांद्वारे सातत्याने परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Team India Cricket Schedule: २० वन डे, २१ ट्वेंटी-२०, १० कसोटी अन् Asian Games; भारताचे पुढील १२ महिन्यांचे क्रिकेट कॅलेंडर

Latest Marathi News Live Update : नंदूरबारमध्ये जखमी अवस्थेत सापडले बिबट्याचे बछडे; वनविभागाकडून उपचार सुरू

Middle East War: पश्चिम आशियातील युद्धामुळे एलपीजीनंतर आता सीएनजीची टंचाई! ऑटो-रिक्षा भाडे वाढले; नवे दर किती?

मुस्लिम हिंदूंपेक्षा चांगला कसा? मुमताज यांच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया; म्हणाल्या- एकीला सोडून दुसरीशी लग्न...

SCROLL FOR NEXT