मुंबई

जेजे उड्डाणपुलाखालील जागेच्या सुशोभीकरणाची जबाबदारी महिला बचतगटांकडे;

CD

जेजे उड्डाणपुलाखालील सुशोभीकरण महिला बचतगटांकडे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ : महानगरपालिकेच्या ''बी'' विभागाने मकदूमशाह–माहिमी (जे जे फ्लायओव्हर) उड्डाणपुलाखालील जागेचे सुशोभीकरण व विकास करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून महिलांना रोजगार आणि स्वावलंबनाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पाअंतर्गत विनावापरातील तीन बेस्ट बसेसचे रूपांतर उपहारगृह, वाचनालय आणि कलादालन यात केले जाणार आहे. या तिन्ही घटकांचे व्यवस्थापन करण्यासाठी महिला बचत गट आणि संघांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. एका गटास एकाच घटकासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर आहे. अर्ज विनामूल्य असून, बी विभाग कार्यालयात जमा करता येणार आहेत. हा प्रकल्प स्थानिक महिलांना उपजीविका आणि सामाजिक सहभागाची संधी देणारा असून, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

Dombivli Politics: 'तुम्ही एक घेणार तर आम्ही चार'; फोडाफोडीच्या वादावर भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार, आरोप-प्रत्यारोपांचा महापूर

शुक्रवारी शाळा बंद आंदोलन! शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा; शिक्षकांची नेमकी मागणी काय?

उद्या विद्यार्थ्यांनी शाळेत यायचे की नाही? सगळे शिक्षक ‘या’ मागण्यांसाठी शाळा बंद आंदोलनावर; शिक्षण संचालक म्हणाले...

SCROLL FOR NEXT