मुंबई

कांदळवनाची अवस्था बिकट!

CD

कांदळवनांची अवस्था बिकट!
पालिका निवडणुकीचा मुद्दा होणार का? पर्यावरणप्रेमींचा सवाल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः मुंबईतील कांदळवने अतिक्रमणाने वेढलेली आहेत. गेल्या काही वर्षांत कांदळवनांच्या जमिनीवर झोपड्या वाढल्या आहेत. उच्च न्यायालयाने कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत, तरीही अनेक ठिकाणी अजूनही या जागांवर अतिक्रमण होत आहे. सध्या कांदळवनांची स्थिती वाईट आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत कांदळवनांचे संरक्षण हा मुद्दा होईल का, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
मुंबईतील कांदळवनांवर अतिक्रमण ही एक मोठी समस्या आहे. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून नुकतेच मालवणीसारख्या भागात प्रशासनाने २०८ पेक्षा जास्त अतिक्रमणे काढली. कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयाने कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत. तरीही कांदळवनांच्या अनेक ठिकाणी अजूनही अतिक्रमण होत आहेत, ही समस्या बनली आहे. त्यामुळे निवडणुकीत हा प्रचाराचा मुद्दा होणार काय, असा सवाल पर्यावरणप्रेमींसह मुंबईकरांना पडला आहे.

कांदळवनांच्या कत्तली
कांदळवनांची कत्तल करून भूखंड बळकावण्याचे प्रकार सुरू असतात. पूर्वी झोपडीदादा झोपड्या बांधून विकत होते. आता विकसकांचे या कांदळवनांच्या भूखंडावर लक्ष असल्याचे दिसते. कांदळवन क्षेत्रात झोपड्या आणि इतर बांधकामे उभारली जात असल्याचे दिसून येत आहे. अंधेरीसारख्या भागात कांदळवनांची कत्तल करून भूखंड बळकावल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

कांदळवने झाली डम्‍पिंग ग्राउंड
कांदळवनांत कचरा फेकला जातो. त्यात प्लॅस्टिक आणि वैद्यकीय कचऱ्याचा समावेश असतो. त्यामुळे तिवरांची झाडे नष्ट होत आहेत. त्याचा पर्यावरणावर परिणाम होत आहे.

प्रशासनाकडून कारवाई
सुरुवातीच्या टप्प्यात प्रशासनाने मालवणीमध्ये सुमारे २८० पेक्षा जास्त झोपड्या आणि बांधकामे हटवून १०,००० चौ.मी. सरकारी जमीन अतिक्रमणमुक्त केल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पर्यावरणीय परिणाम
कांदळवने नष्ट केल्यामुळे पूर आणि सुनामीसारख्या आपत्तींचा धोका वाढतो. कांदळवन नैसर्गिक संरक्षक कवच म्हणून काम करीत असल्याचे पर्यावरणतज्ज्ञांचे मत आहे.

न्यायालयाचे आदेश
उच्च न्यायालयाने २०१७ मध्येच कांदळवन असलेल्या सरकारी जमिनी वन विभागाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले आहेत. अतिक्रमणे आणि कचऱ्यामुळे कांदळवनांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

कांदळवनांच्या जमिनी वन विभागाच्या ताब्‍यात द्या, त्याशिवाय त्यांचे संरक्षण होणार नाही. इतर प्राधिकरणांच्या जमिनींवर अतिक्रमणे होत असल्याचे आपण पाहात आहोत. जैवविविधता आणि पर्यावरण वाचवण्यासाठी कांदळवनांचे संरक्षण झालेच पाहिजे. पालिकेच्या निवडणुकीत हा मुख्य मुद्दा असला पाहिजे.
- डी स्टॅलिन, पर्यावरणतज्ज्ञ

मुंबईच्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कांदळवनांचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. चेंबूरमध्ये छेडानगर परिसरातील अडीच एकर जमिनीवर ‘मिशन मॅंग्रोज’ ही मोहीम राबवण्यात आली. वन विभागाच्या सहकार्याने भविष्यातही ही मोहीम राबण्यात येईल.
- राहुल शेवाळे,
माजी खासदार, शिवसेना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माझ्यावर टाकलेली धाड कटकारस्थानातून: शहाजी पाटील; पालकमंत्री अन् माजी आमदाराबाबत माेठे वक्तव्य, अश्रू अनावर !

Winter Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात झटपट बनवा आलू मेथी पराठा, सोपी आहे रेसिपी

आजचे राशिभविष्य - 02nd December 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 December 2025

घोरण्याची समस्या

SCROLL FOR NEXT