‘पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था
भविष्यात निर्णायक’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था (सेक्युलर इकॉनाॅमी) पर्यावरण संरक्षणासाठी भविष्यात महत्त्वाची ठरणार आहे. बांधकाम क्षेत्रातून निर्माण होणारा कचरा वाढत असून, त्यासाठी वेगळी नियमावली आवश्यक आहे. या क्षेत्रातून पुनर्चक्रीत अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदरसिंह यांनी केले. नवी मुंबईत तुर्भे येथे मंडळातर्फे राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे त्यांनी आज उद्घाटन केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कचरा व्यवस्थापन करणाऱ्या ११ प्रकारच्या संस्थांची ‘पुनर्चक्रीय अर्थव्यवस्था निर्देशिका २०२५’ तयार केली असल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण नियंत्रण क्षेत्रात महाराष्ट्राने केलेल्या कामाची दखल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळही घेत असल्याचे सिंह यांनी नमूद केले. १९७० नंतर नैसर्गिक संसाधनांचा वापर सहा पट वाढल्याने प्रदूषणाचे प्रश्न गंभीर झाले असून, त्यावर त्वरित आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्योगांना सोयीसुविधा देण्यासाठी ‘इज ऑफ डुइंग बिजनेस’ उपक्रम अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. परिषदेला तांत्रिक सल्लागार नंदकुमार गुरव, सहाय्यक सचिव (तांत्रिक) राजेंद्र राजपूत, सहसंचालक सतीश पडवळ यांच्यासह मंडळाचे अधिकारी, कर्मचारी, विविध पुनर्चक्रीत उद्योग संघटनांचे प्रतिनिधी, मटेरियल रिसायकलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ व संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.