अश्लील व्हिडिओ दाखवून पळ
मुंबई : पायी जाणाऱ्या तरुणीस मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवून पळ काढणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला. हा प्रकार मंगळवारी रात्री ११च्या सुमारास माटुंगा येथील हिंदू कॉलनी परिसरात घडली. पोलिसांच्या माहितीनुसार ही तरुणी कामावरून घरी परतत असताना मागून धावत आलेल्या अनोळखी व्यक्तीने अडवून हा प्रकार केला. त्यामुळे भेदरलेल्या तरुणीने घरी जाताच पालकांना हा प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रार दिली.
इमारतीवरून पडून मृत्यू
मुंबई : विक्रोळी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मजूर तपन दास (वय ४७) याचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी घडला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी कंत्राटदार दुलालचंद्र सरकार आणि संबंधित व्यक्तींविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला. पोलिसांनुसार दास तिसऱ्या मजल्यावर सुतारकाम करताना टोल जाऊन पडला. पाहणीदरम्यान सुरक्षेची कोणतीही उपाययोजना घटनास्थळी आढळली नाही.
---
रॅपिडो चालकांला दंड, गुन्हा
मुंबई : प्रादेशिक परिवहन विभागाच्या निरीक्षकांनी अचानक घेतलेल्या चाचणीत रॅपिडो सेवा अवैध सुरू असल्याचे स्पष्ट झाले. निरीक्षकांच्या वाहनचालकांनी कुर्ला ते शीवदरम्यान ॲपद्वारे दुचाकी बुक केली. त्यानुसार पीकअपसाठी आलेल्या तीन दुचाकींवर त्यांच्याकडून प्रत्येकी १० हजारांचा दंड आकारण्यात आला. प्रत्यक्षात ॲपवर कुर्ला ते शीव या प्रवासासाठी निव्वळ ४४ रुपये भाडे आकारण्यात आले होते. या कारवाईनंतर निरीक्षकांनी रॅपिडो कंपनी, संचालकांविरोधात विनापरवाना सेवा सुरू ठेवल्याची तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा नोंदवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.