मुंबई

१५०० स्मार्ट ग्राहकांच्या खात्यामध्ये पैसे जमा

CD

१५०० स्मार्ट ग्राहकांच्या
खात्यामध्ये पैसे जमा

टाटा पॉवरचा रिवॉर्ड्‌स डिमांड रिस्पॉन्स प्रोग्राम सुरू

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : टाटा पॉवरने मुंबईत देशातील पहिला यूपीआयआधारित इन्स्टंट रिवॉर्ड्‌स डिमांड रिस्पॉन्स प्रोग्राम यशस्वीरीत्या सुरू केला आहे. या उपक्रमाला मुंबईतील वीजग्राहकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानुसार २९ नोव्हेंबरला सकाळी सर्वात जास्त वीजमागणीदरम्यान १,५००हून अधिक स्मार्ट मीटर ग्राहकांनी स्वेच्छेने अनावश्यक उपकरणे बंद ठेवून विजेची बचत केली. त्याचे तब्बल ५० हजार रुपये संबंधित वीजग्राहकांच्या यूपीआय खात्यांत रोख बक्षीस म्हणून जमा करण्यात आले.
टाटा पॉवर विजेची मागणी जास्त असताना ग्रीडसह वीज यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी ग्राहकांना ठरावीक वेळी उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन करते. याअंतर्गत स्मार्ट मीटर असलेल्या निवासी ग्राहकांनी २९ नोव्हेंबरला एका तासासाठी अनावश्यक उपकरणे बंद ठेवून सहभाग घेतला. टाटा पॉवरच्या स्मार्ट मीटरिंग सिस्टमद्वारे वीजबचतीचा वास्तविक वेळेत मागोवा घेण्यात आला. या उपक्रमानंतर काही मिनिटांतच सहभागी ग्राहकांना त्यांच्या बक्षिसाचा आणि अभिनंदनाचा संदेश एसएमएस, व्हॉट्सॲप आणि ई-मेलद्वारे मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT