मुंबई

राज्यातील अपघाती मृत्यूंत घट

CD

राज्यातील अपघाती मृत्यूंत घट
परिवहन विभागाच्या सुरक्षा उपायांना यश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. राज्यात अपघातांची संख्या २१८ने वाढली असली तरी अपघाती मृत्यूंच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११९ने घट झाली आहे.

रस्ते अपघात आणि मृत्यूंमध्ये महाराष्ट्र राज्याचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यातील रस्ते अपघात आणि मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येतात. रस्ता सुरक्षा उपायांमुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे.
------------
अपघातांतील घट
जिल्हा : टक्के
नागपूर : २१
पालघर : २०
अमरावती : १७
पुणे : १५
धुळे : १४
छत्रपती संभाजीनगर : १२
------
मुंबई-पुणे द्रुतगतीवरील अपघात
कालावधी : अपघात : मृत्यू
जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ : ६६ : ८२
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ : ५४ : ६१
---------
राज्यभरातील अपघात
कालावधी : अपघात : मृत्यू
जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ : ३२,७८४ : १४,१८५
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ : ३३,००२ : १४,०६६
---------------------------------------
राज्यातील अपघातांची संख्या वर्ष २०३०पर्यंत कमी ५० टक्क्यांनी कमी करण्यासाठी परिवहन विभाग कटिबद्ध आहे. रस्ता सुरक्षा उपाययोजना अधिक भक्कम करण्यात येणार आहे. चालक, नागरिक आणि पादचारी यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- भरत कळसकर, सह परिवहन आयुक्त,
राज्य रस्ते सुरक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Malad News : मालाड क्रीक येथील मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Manchar Protest : भावडी गावकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध; झाडांची तोड थांबवण्याची मागणी

त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

SCROLL FOR NEXT