गणवेशात रील्स बनवणे नडणार
एसटी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाचा गणवेश घालून सोशल मीडिया व्हिडिओ बनवणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. याबाबत मुंबई प्रादेशिक व्यवस्थापकांनी मुंबई/पालघर/रायगड रत्नागिरी/सिंधुदुर्गच्या विभाग नियंत्रकांना कारवाईचे आदेश दिले आहेत.
मध्यवर्ती कार्यालयाने सर्व जिल्हा विभाग नियंत्रकांना ‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओबाबत तत्काळ कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सांगली जिल्ह्यातील अभिजित बुटे यांनी १९ डिसेंबर २०२५ रोजी ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत प्रादेशिक कार्यालयांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार विभागनियंत्रकांना पुढील आदेश दिले आहेत.
आदेशात विभागातील कर्मचारी कर्तव्यावर असताना गणवेश घालून इन्स्टाग्राम, फेसबुक, यूट्युबसारख्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ बनवत असल्याचा उल्लेख केला आहे. यामुळे विभागाची प्रतिमा डागाळली जात असून, कर्मचारी जबाबदारीकडे दुर्लक्ष करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. तसेच दोषी कर्मचाऱ्यांवर उचित कार्यवाही करण्याचे आणि तपशील तक्रारकर्त्यास कळवण्याचे आदेश दिले आहेत. विभागात यापूर्वीही अशा प्रकारची प्रकरणे समोर आली होती. एका चालकाने गाडी चालवताना मोबाईल स्क्रोल करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता आणि विभागावर टीका झाली होती. आता गणवेशात रील्स बनवणे हा प्रकार थांबवण्यासाठी चालक-वाहकांच्या सोशल मीडिया उपक्रमांना लगाम घालण्यात येणार आहे. कर्तव्यकाळात सोशल मीडिया वापरावर आता बंदी येणार असल्याने कर्मचारी सतर्क झाले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कर्तव्यावर असताना गणवेशाची प्रतिमा मलीन करणाऱ्या कृत्यांना आम्ही सहन करणार नाही. प्रवाशांची सुरक्षितता आणि विभागाची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. विभागाकडून आता नियमित तपासणी आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.
फोटो - 478
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.