मुंबई

एम पूर्व–एम पश्चिममध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद

CD

एम पूर्व-एम पश्चिममध्ये ३० तास पाणीपुरवठा बंद
१२-१३ फेब्रुवारीला तुर्भे जलवाहिनीवरील अत्यावश्यक कामे; साठा करून ठेवण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेमार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत गुरुवारी (ता. १२) पहाटे २ पासून शुक्रवार (ता. १३) सकाळी ८ वाजेपर्यंत अत्यावश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कार्यवाहीदरम्यान एम पूर्व विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक १४६, १४७ व १४८) तसेच एम पश्चिम विभागातील काही भागांतील (प्रभाग क्रमांक १५४ व १५५) पाणीपुरवठा एकूण ३० तासांसाठी पूर्णतः बंद राहणार आहे.
एम पूर्व व एम पश्चिम विभागातील पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी तुर्भे निम्नस्तरीय जलाशय येथे १२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीवर १,२०० मिलिमीटर व्यासाचे जलद्वार बसविण्यात येणार आहे. तसेच, तुर्भे निम्नस्तरीय जलाशयास पाणीपुरवठा होणाऱ्या १,२०० मिलिमीटर व्यासाच्या आवक जलवाहिनीचे टनेल शाफ्टला जोडणाऱ्या १,२०० मिलिमीटर व्यासाच्या जलजोडणीची कार्यवाही केली जाणार आहे. त्‍यामुळे एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील काही भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
एम पूर्व आणि एम पश्चिम विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील तीन दिवस पाणी उकळून-गाळून प्यावे. महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा परिसर
एम पूर्व विभाग
१) एच. पी. सी. एल. रिफायनरी, एच. पी. सी. एल. वसाहत, वरुण बेव्हरेजेस, बी. ए. आर. सी., गव्हाणपाडा, इंडियन ऑईल कंपनी लिमिटेड, बी. पी. सी. एल. वसाहत, टाटा वसाहत, नित्यानंद बाग, राणे चाळ
२) आर. सी. एफ. कॉलनी
३) जुनी रिफायनरी क्षेत्र, भारत नगर, जे. प्लॉट, हशू अडवाणी नगर, आणिक गाव, एम. ए. सी. बी. वसाहत, सह्याद्रीनगर, आर. एन. ए. उद्यान, म्हाडा वसाहती, रॉकलाईन इमारती, विष्णू नगर, व्हिडिओकॉन इमारती, एस. जी. केमिकल इमारती, प्रयागनगर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ६ ते दुपारी २.३० वा.)
४) ओम-गणेश नगर, राहुल नगर, अशोक नगर

एम पश्चिम विभाग
१) बीपीटी, टाटा, बी. पी. सी. एल., माहुल गाव, मरवली चर्च, माहुल एसआरए, फारुख गल्ली, खडी मशीन, आर. सी. मार्ग, सिंधी सोसायटी, एसआरए इमारती, वाशी नाका, अंबा पाडा, जिजामाता नगर, वित्तसंचयन, साईलीला रामटेकडी, तोलाराम टॉवर, चेंबूर कॅम्प, गणेश नगर, अशोक नगर, कोकण नगर, वाशीगाव, म्हाडा इमारती, मुकुंद नगर एसआरए, लक्ष्मी नगर, मितुल एन्कलेव, म्हैसूर कॉलनी, एम. एस. इमारती, विजय नगर, आर. सी. मार्ग

HRA Tax: भाडेकरूंसाठी खुशखबर! एचआरए नियमांत ऐतिहासिक बदल; सरकारचा मोठा निर्णय, आता पैसे वाचणार

T20 World Cup मधील पहिलाच विजय भारतीय संघासाठी ठरला विश्वविक्रमी! ऑस्ट्रेलियालाही टाकलं मागे

शिबीर, मसाज ते लैंगिक शोषण! एपस्टिनने हजारो मुलींना जाळ्यात कसं ओढलं? कशी झाली सुरुवात? ३५ लाख कागदपत्रांमधून खुलासा

Mumbai News : मेडिकल विद्यार्थ्याच्या प्रसंगावधानाने वाचला विमान प्रवाशाचा जीव, गोवा-मुंबई इंडिगो विमानातील थरार; डॉ. आर्यन लोलयेकरचे सर्वत्र कौतुक

सलमान खानची RSS च्या कार्यक्रमाला हजेरी, एका कृतीमुळे वेधलं सगळ्यांचं लक्ष, viral video

SCROLL FOR NEXT