मुंबई

एबीसी आयडीसाठी मुंबई विद्यापीठाचे महाविद्यालयांना आदेश

CD

एबीसी आयडीसाठी मुंबई विद्यापीठाचे महाविद्यालयांना आदेश
१५ फेब्रुवारी अंतिम मुदत; अनुपालन न केल्यास होणार दंडात्मक कारवाई
मुंबई, ता. ८ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत अमलात आणण्यात आलेल्या एकेडमिक बँक ऑफ क्रेडिट (एबीसी) प्रणालीची अंमलबजावणी सक्तीची असून, मुंबई विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था तसेच स्वायत्त महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे एबीसी आयडी तयार करून ते संबंधित ई-समर्थ प्रणालीशी संलग्न करणे बंधनकारक आहे.
विद्यापीठाने २९ जानेवारी २०२६ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत महाविद्यालयांतील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर करणे बंधनकारक असून, याचे अनुपालन न केल्यास विद्यापीठ कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाकडून सक्त निर्देश देण्यात आले आहेत.
सर्व संलग्नित महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या एबीसी आयडीचा तपशील विद्यापीठाकडे सादर करण्यासंदर्भात विद्यापीठाने यापूर्वी अनेक वेळा परिपत्रके व सूचनापत्रे निर्गमित केली आहेत. तसेच महाविद्यालयांत शिबिरांचे आयोजन आणि बैठका घेण्यात आल्या आहेत. असे असतानाही काही महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी अद्याप तयार झालेले नाहीत, ही बाब गंभीर प्रशासकीय त्रुटी म्हणून विद्यापीठाच्या निदर्शनास आली आहे.
एबीसी आयडी अभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्रेडिट्स अद्ययावत होणार नसून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांचे एबीसी आयडी तयार झालेले नाही, अशा विद्यार्थ्यांची गुणपत्रिका व पदवी प्रमाणपत्रे राखून ठेवण्यात येतील. तसेच संबंधित विद्यार्थ्यांचे क्रेडिट अवॉर्ड नॅड (नॅशनल एकेडमिक डिपोझिटरी) पोर्टलवर अद्ययावत करण्यात येणार नाहीत, परिणामी विद्यार्थी क्रेडिट अवॉर्ड मिळण्यापासून वंचित राहणार आहेत.
व्यापक विद्यार्थी हित लक्षात सर्व संलग्नित महाविद्यालयांनी तत्काळ कार्यवाही करून दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याचे एबीसी आयडी तयार करून ते ई-समर्थ प्रणालीशी संलग्नित करण्याचे सक्त निर्देश संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळाद्वारे देण्यात आले आहेत. निर्धारित मुदतीनंतर एबीसी संदर्भातील प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांवर विद्यापीठ अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्ह्याची अजितदादा पवारांना साथ! प्राथमिक निकालांमध्ये स्पष्ट आघाडी, सुजाता पवार विजयी

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Solapur ZP election Results: माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Kankavli Zilla Parishad Election Results : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT