मुंबई

लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन तरुणीवर वार

CD

लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन तरुणीवर वार
घाटकोपर येथील घटना; फरार आरोपीचा शोध

मुंबई, ता. ११ : लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या निराधार अल्पवयीन तरुणीवर (१७) एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने चाकूचे वार केल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. एका सामाजिक संस्थेमुळे हा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. ५) ही घटना घडली. जखमी तरुणीच्या पालकांचे २०११मध्ये निधन झाले. त्यानंतर काही वर्षे ती नातेवाइकांकडे तर काही वर्षे अनाथाश्रमात वाढल्यानंतर ही तरुणी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत आली. शालेय शिक्षण घेता घेता या तरुणीने ब्युटीपार्लरचा कोर्स पूर्ण केला होता. त्या जोरावर हाताला काम मिळेल या आशेने तिने मुंबई गाठली. शहरात हक्काचे कोणी नसल्याने दोन दिवस या तरुणीने रेल्वे स्थानकात काढले. काय करावे, सुरुवात कुठून करावी हे सुचत नसल्याने रडू फुटलेल्या या तरुणीला सतीश शिंदे असे नाव सांगणाऱ्या तरुणाने मदतीचा हात दिला. मदत करण्याचे आश्वासन देणाऱ्या तरुणाने पीडितेचा विश्वास जिंकला. प्रथम साकीनाका येथील एका लॉजमध्ये आणि नंतर घाटकोपरमधील रामजीनगर येथील एका खोलीत या तरुणीची निवास व्यवस्था केली. ५ फेब्रुवारीला मध्यरात्री सतीशने तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तरुणीने तो धुडकावला. त्यामुळे संतापलेल्या सतीशने वाद घातला. त्यानंतर स्वयंपाकघरातील चाकूने तिच्यावर सपासप वार केले. चेहरा, हात, पाय, पाठीवर तरुणीला अनेक जखमा झाल्या. राजावाडी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या तरुणीला आशा सदन संस्थेने आधार दिला. तेथील अधीक्षिकेने विश्वासात घेत तरुणीकडे विचारपूस केली. त्यात तिने घडलेला प्रसंग सांगितला. तेव्हा अशा सदन संस्थेने या तरुणीस पोलिस ठाण्यात आणले आणि तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : पुण्यात तलवारी काढून आणि दगडफेक करत दहशत

Abhishek Sharma : हॉस्पिटलमध्ये भरती झालेल्या अभिषेकबाबत महत्त्वाची अपडेट्स; आजारी पडायला मुंबईत नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT