मुंबई

क्लिनिकमध्ये क्यू- आर कोड लावण्यात डॉक्टरांना स्वारस्य नाही

CD

क्लिनिकमध्ये क्यूआर कोड लावण्यात डॉक्टरांना स्वारस्य नाही
दोन लाख डॉक्टरांपैकी १० टक्के डॉक्टरांनी लावले क्यूआर कोड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : भोंदू डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (एमएमसी) राज्यातील सर्व दवाखान्यांमध्ये  क्यूआर कोड  लावणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आले. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने बनावट डॉक्टरांवर अंकुश ठेवण्यासाठी राज्यात  क्यूआर कोड  प्रणाली लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, आतापर्यंत फक्त १० टक्के डाॅक्टरांनी क्यूआर कोड लावले आहेत.
राज्यात दोन लाख १० डॉक्टर आहेत. त्यापैकी एक लाख ४० हजार डॉक्टरांनी त्यांची नोंदणी नूतनीकरण केली आहे.  त्यापैकी फक्त १३ ते १४ हजार डॉक्टरांनी क्यूआर कोड लावले आहेत. आजही मुंबईतील काही ठरावीक डॉक्टर्स सोडल्यास अनेक डॉक्टरांनी क्यूआर कोड लावण्यात स्वारस्य दाखवलेले नाही.
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने यासंदर्भातील (एमएमसी) राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. तो मंजूर होताच त्याची अंमलबजावणी केली जाईल. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी सांगितले, की आतापर्यंत  क्यूआर कोड  नियम ऐच्छिक क्षेत्रात ठेवण्यात आला होता; मात्र आता तो अनिवार्य केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव सरकारला पाठवला होता.
सरकारकडून सूचना प्राप्त झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाकडे आश्वासन दिले आहे. फक्त १० टक्के डाॅक्टरांनी क्यूआर कोड लावला आहे. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक डाॅक्टरांसाठी हा नियम सर्वात आधी लागू झाला आहे. आता अ‍ॅलोपॅथी डाॅक्टरांनाही हा नियम लागू होणार आहे.

आवश्यक कशासाठी?
माहितीच्या अभावामुळे सामान्य लोक अनेकदा डॉक्टरांचा बोर्ड पाहूनच कोणत्याही क्लिनिकमध्ये उपचारासाठी जातात. बनावट पदवी असलेल्या डॉक्टरांची औषधे खाऊन रुग्णांना अनेकदा शारीरिक आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागते. अशा बनावट डॉक्टरांपासून सुटका मिळवण्यासाठी आणि योग्य डॉक्टर ओळखण्यासाठी एमएमसीने ‘नो युवर डॉक्टर’ मोहीम सुरू केली होती. याअंतर्गत सर्व एमबीबीएस डॉक्टरांना क्यूआर कोड घेण्यास सांगितले होते. परंतु चार महिन्यांत केवळ १३ ते १४ हजार डॉक्टरांनी क्यूआर कोड घेतला आहे. पावसाळी अधिवेशनातही मुद्दा गाजला होता. याअंतर्गत एमएमसीने सर्व एमबीबीएस डॉक्टरांना क्लिनिकमध्ये क्यूआर कोड लावणे अनिवार्य करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : जयंत पाटील वाढदिवस साजरा करणार नाही; कार्यकर्त्यांनाही केलं आवाहन

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

Kim Jong Un Successor : उत्तर कोरियाचे हुकूमशहा 'किम जोंग उन' यांचा उत्तराधिकारी ठरला?

T20 World Cup NEP vs ITL: फुटबॉलच्या देशाने इतिहास रचला! इटलीने वर्ल्ड कपमध्ये नेपाळला हरवले; इंग्लंडला धक्का, क गटात खळबळ

SCROLL FOR NEXT